0
4
8
2
9
7
पाऊसधारा
पाऊस धारा
आगमन होता।
स्वागतास
आतूर वसुंधरा।।१।।
ढग गडगड गर्जतो
धडाम डुम ढोल वाजितो।
विजा वाजंत्री कडकडाट
प्रकाशती लखलखाट।२।।
वादळ वारा
सो सो वाहतो।
पालापाचोळा
फेर धरितो।।३।।
झाडे ही आनंदी डोलती
पक्षी सूस्वर गाती।
फुलपाखरु भिरभीरती
पाऊस धारा बरसती।।४।।
पाऊस धारा
रिमझीमती धरा।
ओंजळीत झेला
गार गार जलधारा ।।५।।
पहिल्या वहिल्या
मृगाच्या पाऊस धारा।
अंगावर घेऊ मुग्ध होऊ
ओलेचिंब होऊनी न्हाऊ।६।।
येता पाऊस धारा
जमला स्वागतास सारा।
बाल गोपाळांचा मेळा
पाऊस धारांचा लळा।।७।।
गणेश नरोत्तम पाटील
ता.शहादा,जि.नंदूरबार
0
4
8
2
9
7



