Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

“महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन”

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

“महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन”

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि ५) रायगड–अलिबाग यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने तसेच कर्मचारी व स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. प्राची नेहुलकर (रायगड–अलिबाग), माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हूलवान , जन शिक्षण संस्थान अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, जन शिक्षण संस्थान संचालक डॉ. विजय कोकणे, अवैद्यकीय अधिकारी भगवान जाधव, रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ जिल्हाध्यक्ष विकास पाटील, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष तुषार थळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नर्सिंग स्टाफ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. उज्ज्वला चंदनशिव या जनजागृती रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

सदर जनजागृती रॅली सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग येथून सुरू करण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना कुष्ठरोगाबाबत जनजागृती, गैरसमज दूर करणे, वेळेवर तपासणी व उपचाराचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून समाजात कुष्ठरोगाबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यात यश आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे