Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘कैलास एकनाथ शिकारे’ यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 4

कैलास एकनाथ शिकारे’ यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे अधिव्याख्याता

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: कैलास एकनाथ शिकारे सर आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये गेली २१ वर्षे ज्ञानदानाचे कार्य प्रभावीपणे करीत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आवास केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून गेली ४ वर्षे ते उत्कृष्ट कामकाज करीत आहेत.

अलिबाग तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, आवास या पतसंस्थेचे ते अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम करीत आहेत.

रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी गोवा राज्यातील सांखळी येथील रवींद्र भवन येथे नॕशनल सरल डेव्हलपमेंट फाउंडेशन [ रजि. ], बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी [ रजि. ], बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूर महानगरपालिका माजी महापौर राजू शिंगाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल त्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे