
0
4
8
2
9
0
प्रेमाचे ऑडीट
क्षण कोवळे मन भाबडे
अल्लड तू मज कळले नाही
नवेच भासे सारे काही
तुझ्यासवे दिशा रंगीन दाही
राग- रागिणी नवी कहाणी
प्रित सुगंधी ठायी ठायी
तुझ्या नी माझ्या अंतरात सख्या
क्षण विरहाचे फुलले काही
कधी अनपेक्षित मिळाला दगा
पण मागे मी कधी हटले नाही
विसरून जुने पुन्हा नव्याने उभारले मी
निराधार परीस्थितीवर रुसले नाही
दिल्या घेतल्या वचनांना निभावते
संसाराला एकटेच सोडले नाही
रोज सांजेची तिरीप मोजते
आश्वस्त पाऊल थकले नाही
प्रेमाचे ऑडिट का करावे मी?
भावनांची लय अजून मिटली नाही
अजून मिटली नाही…
आशा कोवे- गेडाम
वणी जि.यवतमाळ
============
0
4
8
2
9
0



