कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
स्पर्श रेशमी; प्रतिमा नंदेश्वर

0
4
8
2
9
3
स्पर्श रेशमी
अजाणता तू भेटलास
स्वप्न सजले डोळ्यात
मन गर्भाच्या अंतरी
फुलली सख्या प्रित
मन जुळली दोघांची
राहवेना तुझ्याविना
वाऱ्यासवे मी धाडते
निरोप माझा साजना
सख्या दूर तू राहू नको
मन माझं जाळू नको
उणीव तुझी नित्य मला
असा निशब्द राहू नको
हाक माझी ऐक ना
मिठित तुझ्या घे ना
स्पर्श रेशमी तुझा
सुखावू दे तना मना
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
==========
0
4
8
2
9
3



