Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एक दिवसीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा

वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी

0 4 8 3 0 0

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एक दिवसीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा

पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार

महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ पुणे येथून..!

वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी

पुणे: (दि ७) समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एक दिवसीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, उद्घाटक म्हणून श्री तानाजीभाऊ जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष, तसेच श्री कॅप्टन परिमल फुलसुंगे, श्री एस पी राठोड, श्री प्रेममूर्ती नवनाथ लिमण,आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, शिवव्याख्याते – ह .भ. प.यशवंत महाराज फाले,महाकाल भक्त उज्जेन श्रीमहंत डॉ.श्रीकांतदास धुमाळ महाराज (दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त),न्यू होम मिनिस्टर प्रस्तुत क्रांतीनाना मळेगावकर इत्यादी प्रमुख उपस्थितीत होते.
पत्रकार दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांनी सर्व पत्रकार बांधवास शुभेच्छा दिल्या,तर राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत आपल्या प्रमुख मागण्यासाठी मुंबई येथे येत्या काही दिवसात धडक मोर्चा राहील तसेच प्रत्येक पत्रकारांनी कुणालाही न घाबरता निर्भय पणे पत्रकारिता करावी, संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांच्या काहीही समस्या असेल तर थेट मला कॉल करावा जेणेकरून त्या समस्येचे समाधान झाले पाहिजे आणि इथून पुढे निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत सामाजिक संघ,माहिती अधिकार,पोलीस मित्र संघ व इतर संघमार्फत गाव तिथे शाखेचे नियोजन करून गोरगरीब जनतेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण झालं पाहिजे व महाराष्ट्र बरोबरच संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असे अध्यक्ष यांनी सांगितले.या एकदिवसीय अधिवेशनामध्ये,श्री कॅप्टन परिमल फुलसुंगे ,श्री एस पी राठोड (शैक्षणिक),मा श्री प्रेममूर्ती नवनाथ लिमण,(सामाजिक) श्री प्रताप निंबाळकर (उद्योजक),श्री अक्षय राजीव शहरकर, (पर्यावरण संरक्षण), श्री शिवा भाऊ पासलकर (सामाजिक व पोलीस मित्र), सौ श्रुती वैभव कढणे,(पोलीस दामिनी पथक), सौ आरती शिवाजी जाधव (पोलीस दामिनी पथक), श्री गजानन लोंढे (संगीत), मा सौ अर्चना धुरदेव, (सामाजिक), श्री अजित निंबाळक (उद्योजक), मा श्री समीर इंदलकर (गडकिल्ले संरक्षक),(भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन स्टाफ), कु.सह्याद्री क्रांतीनाना मळेगांवकर सेलिब्रिटी (संगीत) श्री विजयजी मोरे, (उद्योजक), मा श्री राजेश दिवटे (प्रेरणादायी प्रवक्ते व लेखक), ह .भ. प. यशवंत महाराज फाले,(आंतरराष्ट्रीय कीर्तनकार व शिवव्याख्याते), श्री उमेश लोंढे(गृहरक्षक दल पुणे), डॉ.राजु पांचाळ(वेस्ट फ्रुड इंटरनॅशनल ट्रेनर),दिग्दर्शक, लेखक – अल्ताफ शेख, श्री शिवाजी फुलचंद मुसळे (सामाजिक,झेप फाउंडेशन पुणे संस्थापक /सचिव), श्री माणिक देवकर (क्रीडा अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग पुणे), कुमार कबीर शशि कंधारे (सर्वोत्कृष्ट बालकलाकार),कु.आरुष श्रीपाद हुबळीकर इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले.
तसेच पत्रकार दिनी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ परिवारातील श्री अमोल कोमावार,लक्ष्मण टेकाळे,विजय सूर्यवंशी,पुरुषोत्तम कुडवे,विनोद कनाके,प्रफुल नान्ने,कुलदीप सुरोशे,अवंतिका म्हात्रे,सुनील,सूर्यवंशी,उत्तम ब्राह्मणवाडे,विजय काळे,गजानन काळे,संगमेश्वर कांबळे,आनंदराव शिनगारे,कुसुम पारटकर,माधुरी पिंगळे,सुलोचना जाधव,शरद तांबे,समाधान कांबळे,राजश्री गवळी,मार्कंडेय सिरामवार,सिद्धार्थ धंदरे,करण धोंगडे,भूषण साळुंखे,बालकृष्ण भोसले,सागर सातपुते,संगीता क्षीरसागर,विजयकुमार उघडे,सृष्टी पाटील,मंगेश जाधव,गणेश किनकर,विशाल अडागळे,कांताभाऊ राठोड, गणेश महाडिक,संदीप जाधव,प्रतिभा महालकर,गोपाल बांदल,रजत खाडे, रंजना आडे, शशिम कांबळे, जतिन बोरसे, सागर सातपुते, मनीष ताडे, श्रीहरी अंभोरे, मधुकर गोंगले, इरफान शेख, मंगेश जाधव, गोकुळ देवरे, गुलामगौस शेख, धनंजय हजारी, प्रभाकर धनगर, शब्बीरखान सरवर खान, सुरेश जिभकाटे, नविननिश्चल येनोरकर इत्यादी पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा आयोजित एक दिवशी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा निमित्त पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री विशाल अडागळे,संदीप जाधव,गोपाल बांदल,कांताभाऊ राठोड,गणेश महाडिक,गहिनीनाथ राजे,अमित तांबे,राजेंद्र पन्हाळे,प्रतिभाताई महालकर,वसुधाताई नाईक, आशाताई, प्रदीप बोरा, सचिन शहाणे, सचिन बुराडे अनिल रेडेकर,महालिंग स्वामी,शरद पवार,ज्ञानदेव शिंदे,अमित मोरे,सतीश कोकरे व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विशाल आडागळे,सूत्रसंचालन दिवटे सर यांनी केले तर प्रतिभाताई महलकर यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे