
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*
*🥀विषय : विजयादशमी🥀*
*🍂बुधवार : ०१/ १०/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजयादशमी*
संकटं तर येतातच
कणखर करण्यासाठी
जीवनाच्या शाळेत
परीक्षा घेण्यासाठी..
कधीकधी लढताना
अपयशही येतं
पण तरीही अनुभवाचं
गाठोडं सोबत ठेवून जातं..
म्हणूनच तर
कशाला त्याची भिती
दु:खालाही दे
मिश्कील हसू
ताणून छाती..
संकट, अपयश
भिती आणि दु:ख
‘ही चौकडी’
जेव्हा गाडशील
तेव्हा दिस यशाचे येतील..
पण..
कधीकधी टोचते सुख
मिळत नाही समाधान
हरवते शांतता नि
वाढत जातो ताण..
सुख, समाधान, शांतीचे
सोनं हवंय ना जीवनभर
काम, क्रोध, लोभ
मोह, मद्, मत्सर
‘षडरिपूं’ हरवण्यास
सिद्ध हो सत्वर..
ती चौकडी व ते षडरिपू
असे मिळून दहाजण
जणू शत्रुरूपी रावण..
करून मात त्यावर
साजरा कर
विजयादशमीचा सण..!
*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
दिक्षा दिली बा भीमाने,पाजूनिया संजीवनी।
उध्दारीले कोटी कुळे,विजयादशमी दिनी।।
अंधकार अज्ञानाचा,प्रकाशाने उजळला।
बुध्दां शरणी जावूनी,प्रज्ञासूर्य उगवला।।
या तेजाने दिव्यत्वाने ,निळाई दिसे गगणी…//१//
मानवता करुणेचा,धम्म बुध्दाचा दिधला।
समता शांतीचा मार्ग,या जीवनास दाविला।।
धन्य केले मायबापा,धम्मचक्र फिरवूनी….//२//
भीमराया पावन झाली नागपूर नगरी।
हिच काशी चारधाम गोवर्धनाची पंढरी।।
जयभीमचा गुंजते नारा जगी त्रिभुवनी…//3//
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा. जि ,यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
सण हा विजयादशमीचा,
श्रीरामाच्या पराक्रमाचा.
सत्याचा असत्यावर विजय,
दिवस रावणाच्या वधाचा.
आश्विन शुद्ध दशमीला,
होतो हा सण साजरा.
मुक्त केले दुर्गेने जाचातून,
देवांना संपवून महिषासुरा.
परंपरा शस्त्रपूजनाची,
आणि सोने देण्याची.
धार्मिक प्रथा ही झाली,
संपूर्ण महाराष्ट्राची.
रामलीलेचा समारोप,
रावणदहनाने करतात.
धर्म, न्याय, सत्याचा,
स्नेहाने विजय दर्शवतात.
शेतकरी पूजाअर्चा करतो,
या दिवशी नांगर-बैलाची.
दसरा सण साजरा करतो,
प्रथा स्नेहभाव जपण्याची.
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
काल वानर आज नर, नराचा व्हावा नारायण
शांती समता विश्वबंधुता, करिता व्हावे पारायण//
सत्य परेशान होते हैराण,नसेच होत पराजित
असत्य जरी वरचड तरी, निश्चितच होते चित.//
गजब किती कृष्णनिती, आधी करावी शिष्टाई
नसे उपाय असे पर्याय,अंतिमतः अटळ लढाई//
छल कपट अहम् निपट,यास्तव हा दुर्गावतार
बल बलिष्ठ अती गर्विष्ठ, महिषासूर केला ठार.//
शिवशिष्य कर्मठ परी उर्मठ, हरला लंकापती
एक वचनी एक पत्नी, राम जिंके सत्यसंगती.//
सत् रक्षिले खल मर्दिले, म्हणून विजयादशमी
आज दसरा व्हावा हसरा,सुवर्ण सन्मान शमी.//
केले साकार ह्रदयाकार,पवित्र आपट्याचे पान
भेटी गाठी गळामिठी, देवू परस्परा सुवर्ण दान//
जपू शास्त्र पुजू शस्त्र, करू आज सिमोल्लंघन
सोने घ्या सोने द्या,परस्परास देवू प्रेम अलिंगन//
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
अश्विन शुध्द दशमी दिवशी
विजयादशमी दिन सोन्याचा
हा दिन साडेतीन मुहूर्ताचा
आरंभ करुया शुभकार्याचा
श्रीरामाने रावण वधिला
अज्ञातवास पांडवांचा संपला
शमी वृक्षातील शस्त्रे घेतली
हा दिन मग शौर्याचा बनला
देवीने महिषासुर मर्दिला
विजय असुरांवरी मिळवला
बाबांनी बौद्ध धर्म स्वीकारला
धम्मचक्र प्रवर्तन हा दिन झाला
आपट्याच्या झाडा- पानांवरी
कुबेराने सुवर्णवृष्टी केली
सुवर्णरुपी या पर्णदलांना
एकमेका देण्याची प्रथा पडली
सीमोल्लंघन या दिनी करती
शौर्य प्रतिक शस्त्रे पूजती
एकात्मतेचा संदेश देऊनी
अखिल विश्वाशी नाते जोडती
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
विजयादशमी सण
विजय यशोगाथेचा
रणदुंदुभुन आला क्षण
ध्येय शिखर गाठण्याचा॥१॥
आम्रतरू पताका घराला
गेंद फुलांच्या माळा
तोरणे लावून दाराला
सुरू होई मंगल सोहळा ॥२॥
एक आपट्याचे पान
त्यास हृदयाचा आकार
प्रेमाचा झंकार निनादून
आनंदाचा मिळून रूकार॥३॥
हर्शोत्सव या सणाचा
विजयादशमी दसरा,
करून वध रावणाचा
रामराजाने दिला आसरा॥४॥
संपवून सारा भ्रष्टाचार
संस्कृतीचा ठेवून मान
आनंदे करू सण साजरा
देऊन सोनियाची पान॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
आठराशे छप्पन साली
विजयादशमीच्या दिनी..
दीक्षा दिली बा भीमाने
धर्मांतर आणले घडवूनी…
लाखो अनुयायी आणि
भंते, भिखू संघ घेऊनी..
धम्म बुध्दाचा स्विकारला
बावीस प्रतिज्ञा देऊनी….
मानवतेचा अन् समतेचा
बुध्दाचा धम्म स्वीकारून..
मार्ग दाविला प्रगतीचा
ठेवले उंच शिखरी नेऊन…
थोतांडातून,अंधश्रदधेतून
मुक्त करूनी बहुजनाला..
विज्ञाननिष्ठ धम्म बुध्दाचा
कोटी जणांच्या उध्दाराला…
देश विदेशातून उसळतो
जनसागर नागपूर भूमीवर..
नतमस्तक होती श्रध्देने
बाबा भीमाच्या चरणावर…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विजयादशमी*
14ऑक्टोबर 1956ला
विजयादशमीचा झाला सोहळा
लाखो अनुयायांना दिली धम्म दीक्षा
हा उत्सव होता आगळा वेगळा
नेत्र दिपले सर्वांचे
हा सोहळा बघून
आभार मानले बाबांचे
हृदयस्थ हृदयातून
वाहू लागली विजयाची गंगा
लाखो लोकांच्या डोळ्यातून
एक सत्याचा स्वीकारला मार्ग
मुक्त झाले हिंदू धर्मातून
आपल्या मनावर मिळविला विजय
जो अंधारात होता जगत
उजाळला तो दिवस विजयाचा
सारा जग होता पाहत
14 ऑक्टोबर 1956 चा उत्सव
हा होता विजयाचा उत्सव
सर्वांना करून धम्मात परिवर्तन
केले त्यांचे शुद्ध विचार व मन
हा ऐतिहासिक सोहळा नागपूरचा
होता एक दैदिप्यमान
मानले आभार बाबांचे
जगू लागले एक उच्च जीवनमान
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
*विजयादशमी*
साडे तीन मुहूर्तापैकी
विजयादशमीचा सण
नवीन खरेदी आवर्जून
देवी सरस्वतीचे पूजन…!!
पुराणकाळी श्रीरामाने
रावण पराभूत केलेला
शेवटी सत्याचा विजय
आजपर्यंत हो झालेला…!!
दहन करतात रावणाचे
तसे करावे कुविचारांचे
सोनं देण्याची जुनी प्रथा
लुटावे सोने सद्विचारांचे…!!
ज्ञानार्जनास आशीर्वाद
सरस्वती देवीचा जसा
वडिलधाऱ्या सर्वांचाच
वेळप्रसंगी कामी तसा…!!
विजयादशमी सणाला
नवी उमेद संकल्प नवा
सत्कर्माचा मार्ग धरूनी
मानवतेचा दीप लावावा..!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🚩🔥♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





