काय असतयं हायजॅक…?
कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड, जि.नागपूर

काय असतयं हायजॅक…?
चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश पदार्थशास्त्र तसेच ते समाजसुधारक होते. त्यांचे विज्ञानाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे.उत्क्रांती कशी होते. डार्विनच्या सिध्दांताला त्याच्या काळापासून विरोध झालेला दिसून येतोय.निसर्गात जगण्यासाठी योग्य ते बदल ज्या प्राण्यामध्ये घडतात आणि अशा तर्हेने बदल घडल्यामुळे जे प्राणी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात तेच जगतात आणि बाकीचे कालओघात नष्ट होतात. आणि ही प्रकिया सतत सुरू असते.अर्थातच माकडापासून माणूस बनला हा सिध्दांत डार्विनचा रेटला गेला. माणसाच्या मेंदूमध्ये ढोबळ मानाने दोन भाग असतात त्यामधील एक असतो भावनांचा मेंदू यामध्ये प्रामुख्याने भावनाचे राज्य चालते.
पटकन प्रतिक्रिया देण्यासाठी हा प्रामुख्याने उपयोगी पडतो. दुसरा मेंदूचा भाग असतो विचाराचा मेंदू स्वाभाविकपणेच तो थोड्या उशीराने आणि वेळ घेऊन कार्यान्वित होतो.सतेसाठी धर्माचे राजकारण करणारे लोक समाजात जाणीवपूर्वक पेटती ठेवलेली धर्मभावना आणि व्देषाचे राजकारण याच्या माध्यमातून आपल्या विचारी मेंदूच्या कामात अडथळे आणत असतात हया गोष्टी विचार करणाऱ्या मेंदूतील रक्तप्रवाहाचे शब्दशः अपहरण करून भावनिक मेंदूकडे माणसांना मग विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विसर पडत जातो.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका भोंदू बाबाने आयोजित केलेल्या एका संत्सगात शंभरपेक्षा अधिक महिला आणि मुलांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाल्याची घटना फार जुनी नाही. त्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले कोणी आपल्या थेट ओळखीचे असण्याची जवळजवळ शक्यता नाही.तरी देखील अनेकांना या दुर्घटनेने खुप हळहळ वाटली.मृताचे जवळचे नातेवाईक आणि कुंटुबीय यांचे दुःख आणि संतापाचा तर आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. प्रत्यक्षात मात्र पत्रकारांशी बोलताना त्यातले काही लोक म्हणाले, “आमचे प्रियजन हे बाबांच्या सेवेत मृत्यू पावले आहेत. हे खूप पुण्याचे काम आहे.आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.”
या बाबाचा दावा असा,की त्याच्याकडे देवी शक्ती आहे आणि म्हणून त्याच्या गाडीच्या टायरची धूळ डोक्याला लावायला लोक एकदम धावले आणि चेंगराचेंगरी झाली होती ही घटना घडून आता इतके महिने उलटले,या प्रकरणात ना त्या बाबाला अटक झाली, ना त्याच्यावर खटला चालला. कारण अगदी सोपे आहे उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यातले कोणीही या बाबाला हात लाऊन त्याच्या भक्तांना दुखवू इच्छित नाहीत. विज्ञानवादी असा किंवा धर्मवादी कर्मकांडावर विश्वास ठेवण्याची एक जैविक खोड आपल्या सर्वामध्ये आहे. अशाच प्रकारे आपणास ‘हायजॅक’ केले जाते हे मेंदूविज्ञान आपण समजून घेतले पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्ट चिकित्सा करून तपासून घेण्याची देखील प्रंचड मोठी आणि एकमेव द्वितीय क्षमता आपल्याकडे आहे हे देखील आपण विसरता कामा नये. या दोन्ही गोष्टीविषयी आपण किती सजग राहणार आणि त्याचा कसा वापर करणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, जि.नागपूर
=========





