0
4
8
2
9
7
मायेची गोधडी
मायेची गोधडी
घेऊ पांघरून
आठवांची ऊब
ओंजळ भरुन १
जुन्या आठवणी
खोल काळजात
उरात पेटते
मृदू सांजवात २
आजीच्या प्रेमाची
मायेची गोधडी
रात्री सोबतीला
गोष्टी सवंगडी ३
कुणी काही सांगे
सारे आठवावे
मायेला स्मरून
सौख्यगीत गावे ४
मायेचा ओलावा
आईच्या गर्भात
प्रेमाचा गारवा
लाभे जीवनात ५
सचिन पाटील
अलिबाग, रायगड
=============
0
4
8
2
9
7



