जातीय राजकारणानेच देशाचा बट्टयाबोळ..!!
श्याम मोहन सिंग राठोड कारंजा लाड, जिल्हा वाशिम
जातीय राजकारणानेच देशाचा बट्टयाबोळ..!!
भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947 ला. त्यानंतर देशात राज्यघटना लागू झाली 1950 ला. पण निवडणूक होऊन देशात सरकार स्थापन झाले वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आपापली पक्षाची जाहीरनामे काढून जनतेला अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून दिली. भारतात वेगवेगळ्या घटक राज्यात पक्षाचे ध्येयधोरणे मांडू लागली. कितीतरी वर्ष काँग्रेस सत्तेत होती वेगवेगळ्या योजना आणून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी केला. पहिले देशाला व देशभक्तीला महत्त्व होते, निस्वार्थ वृत्ती होती ,जातीय समीकरणे नव्हती, देशाची प्रगती झाली पाहिजे ही प्रवृत्ती होती. देशासाठी कित्येक लोकांनी बलिदान दिले, निःस्वार्थवृतीने देशाच्या प्रगतीसाठी झटत होते. परंतु आता देशभक्तीला प्राधान्य नसून जातीला महत्त्व देऊन देश आता जातीय समीकरणे ठेवून निवडणुकांमध्ये भाग घेत आहे.
ज्या मतदार संघात ज्या जातीचे प्राबल्य आहे, त्यांनाच निवडणुकात पक्षाची तिकीट देऊन राजकीय पक्ष पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहे. जाती-जातीत तेढ निर्माण होत आहे. प्रत्येक पक्ष सत्तेत येण्यासाठी पक्षाचा जाहीरनामा सांगून लोकांना प्रलोभने दाखवून मतदारांना दिशाभूल करताना दिसत आहे. मतदारांना दिशा देण्याचं काम पक्षाने केली पाहिजे, परंतु सत्तेत राहण्यासाठी सरकार स्थापन करण्यासाठी आमदार, खासदारांना प्रलोभने दाखवून पक्षांतर करून सत्ता स्थापन केल्या जात आहे. निव्वळ महाराष्ट्रात पक्षांतर होत नसून, अनेक घटक राज्यात जातीय समीकरणे समोर करून देशाचे वाटोळे करत आहे. निस्वार्थ प्रवृत्ती देशभक्ती स्वाभिमान या बाबीला महत्त्व न देता, स्वतःचा फायदा कसा होईल ही बाबीकडे राजकारणी वळत आहे.
स्वार्थी प्रवृत्ती बोकाळली आहे, टक्केवारी, कमीशन, गैरव्यवहार याला महत्त्व देऊन सरकारी तिजोरीवर डाका टाकत आहे देशहीत पाहण्यापेक्षा माझ्या स्वतःचा फायदा कशात आहे मला कॅबिनेट मंत्री ,राज्यमंत्री ,पालकमंत्री करा अशी अटकळ टाकून देश बरबादीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता असली तर स्वतःचा फायदा करण्यासाठी या विचारांना तिलांजली देऊन पक्षांतर करत आहे. असेच होत राहिले,तर देशावर कर्जाचे ओझी वाढत राहणार आणि देशात अंतर्गत कलह निर्माण होऊन, जाती जातीत ती
तेढ निर्माण होईल. वाद विवाद होऊन जातीय राजकारणाला महत्त्व प्राप्त होईल, जातीच्या लोकांना कामाचे निविदा देऊन काम निकृष्ट केले तरी त्या बाबीकडे कानाडोळा करत राहील.तर भ्रष्टाचार वाढेल अवैध्य संपत्ती काही विशिष्ट लोकांकडेच त्यांची मक्तेदारी राहील. आपला व्यवहार चालविण्यासाठी वाटेल ते पैशाचा जोरावर करेल . ज्यांच्याजवळ अमाप पैसा तो” बळी तो कान पिळी “या म्हणीप्रमाणे उदाहरणादाखल बीड प्रकरण संतोष देशमुख, वाल्मीक कराड अशी अनेक उदाहरणं देता येतील.
आज बेकारी वाढली, भ्रष्टाचार वाढला , गैरव्यवहार वाढला, स्वार्थी वृत्ती वाढली, भावकीत संपत्तीसाठी वैमनस्य वाढले, जातीय समीकरणे बदलत आहे, प्रत्येक जात आपापल्या समाजाच्या नेत्यांना निवडून कसे आणता येईल यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्याचे दुष्परिणाम वाढत जाऊन वाद-विवाद, मारामारी, खून वादविवाद अशी अनेक प्रकरण घडत आहेत. लोकांची धारणा अशी होईल की” जाती सोबत, खावे माती “त्यासाठी काहीही होऊ शकते. माणसाची अधःपतन होऊन माणसा माणसात सलोखा राहणार नाही, निस्वार्थ व्यक्ती सापडणार नाही .एका राजकारणासाठी जातीला महत्त्व द्यायला चुकीचे काम करून ” एकाला न्याय ,दुसऱ्यावर अन्याय “होईल. त्यातून समीकरणे बदलत जाईल एक दिवस असा येईल, जातीय राजकारणाने देशाचा बट्ट्याबोळ होईल म्हणून सावध होऊन पावले टाकावी. भारत हा देश कृषीप्रधान देश आहे येथे अनेक जातीची लोक राहतात. आपण प्रत्येकाने प्रत्येक धर्माचा आदर बाळगावा, नाहीतर देशाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही .
श्याम मोहन सिंग राठोड
कारंजा लाड, जिल्हा वाशिम
======



