
0
4
8
2
8
4
वेग वा-याचा
वेग वा-याचा वा-याचा
खूप खूप जो-याचा
घाबरले सगळे
दबला आवाज जंगलाचा
वाकून पाही हळूच
हरीण गवतातून
मैना डोकावे
थबकत पानातून
भित्रा ससोबा
गेला पळून बिळात
सरसर चढली खारूताई
लपली झाडाच्या फांदीत
सोंड उभारून हत्तीदादा
चालत होते ऐटीत
पाहून सगळ्या जंगलाला
बोलू लागले शांततेत
घाबरले सगळे म्हणून
वा-याला चढला माज
जंगलाने पाळले मौन
कंटाळून वा-याला वाटली लाज
मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ
0
4
8
2
8
4



