0
4
8
3
0
0
लिहीते होऊ या
शब्दाला शब्द जोडू या
अनुभवांना भाषा देऊ या
थोडे थोडे करून वाढता
गगन भरारी घेऊ या
चला लिहीते होऊ या
पंख फुलपाखरांचे न्याहाळू
कोकीळेचे सुंस्वर गाणे
केकावली ती मनमयूराची
शब्दाशब्दातून ओवू या
चला लिहीते होऊ या
इंद्रधनूची कमान अस्मानी
रिमझिम श्रावणसरीची कहानी
भादव्यातले अवखळ पाणी
मुक्त पृष्ठावर उधळू या
चला लिहीते होऊ या
हिरवे चंचल रान मोहक
ग्रिष्माचा तो ताप दाहक
कोवळ्या उन्हातील अंकुरण
लेखणीला प्रेरणा देऊ या
चला लिहीते होऊ या
नवजात बाळाचे मुक्त रूदन
बोबड्या बोलाची मुक्त उधळण
सुरकुतलेल्या वदनाची शान
अनुभव डोळ्यातले वाचू या
चला लिहीते होऊ या
सविता धमगाये,नागपूर
0
4
8
3
0
0



