0
4
8
2
1
9
मोहमाया
भुलवून मनाला
पापमार्गा लावते
दुष्कीर्ती पसरवते
मोहमाया….
जाता मोहून
स्वत्वा हरविते
वैरभाव आणते
मोहमाया…
करता अंगिकार
स्वार्थाला खतपाणी
नात्याची तोडपाणी
मोहमाया…
हव्यासापोटी तू
गुंतला जर तिच्यात
वाढवते वितंडवाद
मोहमाया…
माणसासारखा वागून
सोडून पाखंडी जीवन
लाव एकमेकांना तू
मोहमाया…
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
======
0
4
8
2
1
9



