Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 3 0 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : चमनगोटी📘*
*🔸मंगळवार : १६ /सप्टेंबर /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चमन गोटी*

चमन गोटी, चमन गोटी,
खेळू सारे हसरे खोली।।१॥

गोट्या फिरती गोल वर्तुळ,
टाळ्या वाजे, हशा झुळझुळ।।२॥

“माझी झाली” म्हणे आनंदी,
खेळ रंगे, मस्ती गोडी।।३॥

जिंकू कोणी, हरू कोणी,
मैत्री जिंकते शेवटपणी।।४॥

गोट्या नाचती टप टप टप,
गाणं गातात लहान गटगट।।५॥

चमन गोटी शिकविते बाळा,
मैत्री, प्रेम, जिद्द उजळा।।६॥

*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*चमन गोटी*

वर्गात होता गण्या टकला
चमन गोटी चीड तयाची
मस्ती त्यात रोजच होई
गण्या,मन्या आणि शिवाची..१

शिक्षक शिकवीत वर्गात
लक्ष नसते कुणाचे कधी
कोण चमनवर मारी खडी
नंबर माझा सर्वात आधी…२

चमन गोटी चमन गोटी
चमके रोज गण्याची टकली
वाटत होते जाऊन आपण
खडूने काढावी त्यावर चकली…३

चमन गोटीचा करू तबला
वाजू त्यावर ताक धिंन धिंन
ताल धरूनी घेऊ फेरा
सुरू करा साडे माडे तीन…४

एकदा घेतला खेळ सरांनी
ठेऊन माथी पुस्तक शर्यत
चनम वरून पडले पुस्तक
स्पर्धा सुरू होण्याच्या आत…५

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्यां मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*चमन गोटी*

बघा माझ्या डोक्यावर
होते बरेच केस
ते सारे गेले निघून
बघा आता माझा भेस

चमन गोटी सारखा
दिसतो माझा डोका
माझे मित्र चिडवतात
हाच मिळाला त्यांना मोका

पहले आम्ही खेळायचे
गोल काचाच्या गोट्या
त्याच्या मध्ये होता
एक मोठा सोट्या

खूप मजा यायची
टकल्यावर हात फिरवायचे
काढून टाकले सारे केस
चमन गोटी म्हणून चिडवायचे

डोक्यावरचे पूर्ण केस
आहेत काढून टाकलेले
तो डोकं दिसतो चाटी
त्यावर हसतात सर्व मुले

आहे तो गजब शब्द
सारेच असतात स्तब्ध
टक्कल चाटी म्हणतात
आश्चर्याने पाहत असतात

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चमन गोटी*

चमन गोटी रे चमन गोटी
तुझ्या डोईवर शिऱ्याची वाटी..

चमन गोटी रे चमन गोटी
तुझे डोके म्हणजे वाटे पाटी….

चमन गोटी रे चमन गोटी
केली कोणी तुझी सांगना चाटी…

चमन गोटी म्हणून करतो त्याची गम्मत..
तरीही चिकलू कधीच नाही चिडत..

चिकलू आहे अभ्यासात हुशार…
आम्हीं मुले त्याची खोडी काढतो फार..

घालतो तो पांढरी शुभ्र टोपी थाटात…
वारा आला की उडते ती झटक्यात…

कसा ही असला तरी मित्र आमचा खरा…
मित्रांचा मित्र चिकलू आमचा हीरा…

आई म्हणते कोणाचा व्यंग्यावर हसायचे नाही..
कमीपणा सर्वात फक्त शोधून पाही..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*चमनगोटी*

सुटीचा दिवस रविवार
खेळायला जमले मित्र
तेवढ्यात आला फुगेवाला
त्याभोवती गलका एकत्र

निळे,लाल,नारिंगी,शुभ्र
विवीध रंगांचे फुगे सुंदर
फुगवती प्रत्येकजण
चढाओढीने निरंतर

बाळू जवळ बालमकाकडी
लांबलचक फुगवू लागला
तेवढ्यात बाळू ओरडला
फुगवताना फुगा फुटला

फुग्याच्या कातडीची मग
लहान तुकड्यात वाटणी केली
चमनगोटी तयार करून
चटकन् सोनुचे डोक्यावर फोडली

चिकचिकी, चमन गोटी
तळहातावर घासली
सुंदर असा आवाज येऊन
टचकन् ती फुटली

लागला छंद मुलांना
चमनगोटी तयार करण्याचा
एकदुस-याच्या डोक्यावर
आनंद घेती फोडण्याचा.

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*चमन गोटी*

म्हणायचे मला सारेच चमन गोटी
पावसाळ्यात चप्पी हीच हातोटी

शाळेत येता जाता केस भिजायचे
सतत भिजता सर्दी पडसे व्हायचे

वडील मग न्हावी जवळ न्यायचे
वस्तऱ्याने सगळं भादर म्हणायचे

होई मग माझी चप्पीच डोक्याची
जशी काय चमन गोटी दिसायची

मित्र चिडवायचे,खवड्या मारायचे
डोक्यात मग बुंडूलचं वर दिसायचे

थोडाफार त्रास पण व्हायचा तसा
उजडा चमन गोटी मात्र दिसायचा

गोटी खेळतांना तर मुद्दाम होऊन
खिजवत मित्र चमन गोटी म्हणून

चमन गोटी कशी न्ह्याळ दिसतेय
माझे ही डोके जणू तसेच वाटतेय

ठरवलं गोटी खेळ खेळणार नाही
सगळेच केस पण कापणार नाही

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*चमनगोटी*

खुप मजेदार होते बालपणी खेळ
सुट्टीच्या दिवशी जमायचा मित्रांचा मेळ

निरागस बालपण, खेळही होते न्यारे
चमनगोट्या वेचण्या, नदीकाठी जमायचो सारे

सागरगोटीपरी गुळगुळीत, वेचायचो खिसे भरून
त्यांच्या वजनाने कधी, खिसेही जायचे फाटून

कित्येक वेळा खाल्ला आईचा ओरडा फार
कुणा, कुणाला तर, बसायचा बेदम मार

गोट्या सोबत खेळायचे,गमतीदार कित्येक खेळ
कळतं नव्हता खेळताना कसा निघून जायचा वेळ

चमणगोट्या खेळताना, वेचले ज्ञानाचे मोती
गुळगुळीत गोट्यामुळेच झाली जीवनाची प्रगती.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️
*चमन गोटी*

सोनी पडली आजारी
खूप खूप ताप आला
शाळेत गैरहजरीमुळे
अभ्यास नाही झाला…

अभ्यासात हुशार ती
त्यामुळे फोन बाईंचे
आराम कर सोनी तू
ऐक बाबा नि आईचे…

खूप ताप अशक्तपणा
केस लागले तिचे गळू
पाहून आरशात स्वतः
सोनी रडली मुळूमुळू…

बाईंनी आधीच सर्व
मुलांना ताकीद दिली
चिडवायचे नाही बघा
चमन गोटी सोनी आली…

बाईंचे म्हणणे सर्वांनी
केले कबूल मनापासून
नाही चिडवणार आता
कोणालाच आजपासून…

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🎈🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे