आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
सनई चौघडा
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0
5
1
6
5
2
सनई चौघडा
शुभमुहूर्त आला जवळी
दारी निनादला सनईचौघडा
लग्नमंडपी वर्हाडी जमले
झाला आनंद तो केवढा
शुभमंगल सावधान
गुंजला सुरेल ध्वनी
लग्नमंडपही शहारला
बोल पडता हे कानी
मायबाप नववधूचे
गेले गहिवरून आता
लेक चालली सासरला
परका माहेरचा रस्ता
वाजतो सनईचौघडा
आला निरोपाचा क्षण
गाली ओघळले आसू
नवरीचे गहिवरले मन
किती पुण्यवान मायबाप
तुकडा काळजाचा काढून
जीवापाड जपले आजवरी
करावे लागते कन्यादान
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
========
0
5
1
6
5
2



