
बहुमताने
ओळखून नसताना ,का करतोस दोसती।
जे आधी पडून पाया , मग लाथा मारती।।
किंमतीचा तुच आहे, तुझेच अमुल्य मत ।
हजार पाचशेलाच ,कारे जातोस विकत।।
माणूस जन्म म्हणूनी ,जन्मलास भूवरी।
लांडी लबाडीने तुझी ,फिरवतोस भिंगरी।।
राजा निवड असा तू , जो प्रजेला हितकारी।
लालसेने पैशाच्या तो , नसावा कधी भिकारी।।
उध्दार तुझा माझाही ,मानल्याने संविधान।
भीमाने तारले तुझे , होते जीवन गहाण ।।
फेकून उष्टे तुकडे , मालामाल करतील।
तुझ्या इज्जतीलाही ,वेड्या विकत घेतील।।
लुच्चे लबाड आहेत, कार्यकर्ते हजारांनी।
सरड्याचे रंग घेते , मोसमाच्या बदलांनी।।
निवडून दे अशाला,तुझा लोकप्रतिनिधी।
निस्वार्थ सेवा समाजा , देई विकासाची संधी।।
जावू नकोस विकल्या , ऐकून घेरे माणसा।
खरा तू लोकशाहीचा ,वारस आणि वारसा।।
बहुमताने कोणाही , जिंकविने बरे नाही।
तुझाही घात करेल , अन् भोळ्या समाजाही।।
लोकशाही जाळू नको ,टाकून ठिणगी आग।
आतातरी सुधारारे , संविधानान्वये वाग।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ





