
0
6
3
9
6
0
चिऊताई
चिऊताई चिऊताई
नेहमी असते कामात
बाळाला तुझ्या
मी देते दूधभात
खरं सांगतो तुला
तू सोडू नको बाळा
कावळ्याचा आहे
तुझ्या बाळावर डोळा
तू तर त्याला
म्हणतेस दादा
पिल्लं पळवतो
तुझी सदानकदा
आईने बशीत
ठेवले पाणी
चिऊल्याला दे
तुझ्या चोचिनी
काऊ आला,काऊ आला
पळा पळा पळा
घाबरू नको चिऊताई
चिंगी वाचवेल तुझ्या बाळा
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर
0
6
3
9
6
0



