
0
5
1
7
5
8
परतफेड
ह्रदय तुझे निर्मळ
आई वात्सल्याचा सागर
तुझे अनंत उपकार
आम्हा मुलांवर
तू सुगंधाचा बहर
तू वार्याची लहर
शीतल तुझी माया
सकल आम्हावर छाया
कष्ट केले आम्हासाठी
अपार तुझी महती
तू संस्काराचा वेलू
तूच ज्ञानाचा वेणू
तूच आदिशक्ती
तूच मांगल्याची मूर्ती
तूच चैतन्याची स्फूर्ती
जगी तुझीच कीर्ती
तुझे उपकार अनंत
नच परतफेड या जन्मी
तुझ्याच सारखे जगी नसे कुणी
मी भाग्यवंत तुझा सदा ऋणी
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
5
1
7
5
8


