0
4
8
2
8
4
त्या पैलतीरी
त्या पैलतीरी आहे
माझा साजन उभा
थांब जरा घननीळा
उजळू दे या नभा
वाट पाहते केव्हाची
येणार माझा साजन
आर्त साद घालती
माझ्या पायीचे पैंजण
नटूनथटून मी अशी
उभी आम्रतरू खाली
नको बरसू रे पावसा
नको ढगांच्या पखाली
भेटीसाठी तळमळतो बघ
जीव माझ्या साजनाचा
आड आला आता प्रवाह
नदीच्या वाहत्या पाण्याचा
किती करावी विनवणी
तुलाच रे आता मेघराजा
थांबू देत ना या सरी
उतरू दे भावनांचा बोजा
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
==========
0
4
8
2
8
4



