
0
5
7
8
9
7
असे कसे बोलायचे
असे कसे बोलायचे
मम मनी जे जपले
प्रीतरंग लेवूनिया
तुझीच मी जाहले
हळुवार झुळूक येते
तुझी चाहूल घेऊनी
चांदण स्पर्श सखया
टाके मजला मोहुनी
तुझ्या बासरीचे सूर
मीच झाले रागिणी
तुझ्या धुंद मिठीत
गंध दरवळे चंदनी
गारूड हे निळाईचे
मीच सख्या पांघरले
तुझ्या डोळ्यांचा ऐना
बिंब माझेच दिसले
अद्वैत असे आपले
मी तुझीच सावली
रोम रोमात श्रीहरी
राधा जगात व्यापली
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
========
0
5
7
8
9
7



