कैडेट अखिलेश पाटील याच्या चित्रास द्वितीय क्रमांक
दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूल, चिखलदरा जि अमरावती येथे पालक मेळावा व स्नेहसंमेलन
कैडेट अखिलेश पाटील याच्या चित्रास द्वितीय क्रमांक
दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूल, चिखलदरा जि अमरावती येथे पालक मेळावा व स्नेहसंमेलन
सैनिकी प्रात्यक्षिकाचे आयोजन व सत्कार समारंभ उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अमरावती: (दि २५): दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूल, चिखलदरा जि अमरावती येथे पालक मेळावा व स्नेहसंमेलन नुकतेच भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाले.
याप्रसंगी विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, गणित व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक व सहशालेय विषय प्रदर्शनात वर्ग ६ वी ते १० वीच्या ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आयोजित चित्रकला प्रदर्शनात वर्ग १० वीचा कैडेट अखिलेश पाटील याच्या सर्वधर्म समभाव या चित्रास सर्वद्वितीय क्रमाक प्राप्त झाला असून चित्राचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
वर्घशिक्षक बालाजी काळे, राऊत सर मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंदांनी दीपशिखा गुरुकुल तर्फे त्याचे अभिनंदन केले. तसेच गणित प्रदर्शनातही अखिलेशने ‘क्विज बोर्ड’ हा प्रकल्प तयार केला आहे. त्याबद्दलही त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.