0
4
8
2
8
6
सारं काही प्रेमासाठी
स्वर्गात बांधल्या जातात
सात जन्माच्या गाठी
तिचं माझं हसणं रुसणं
सारं काही प्रेमासाठी
राधा कृष्णावर करी प्रेम
मधुर सुरांच्या बासरीवर
भावना अलगद मनात
निस्वार्थी प्रेम सख्यावर
दया करुणा मैत्री असावी
पवित्र निर्मळ हृदयात
कलह नसावा कसलाही
प्रेममयी शुद्ध अंतःकरणात
नात्यातला गोडवा जपा
प्रेमात नको तोलमोल
सारं काही प्रेमासाठी
हेच खरे आयुष्यातील बोल.
अर्चना राजू ईंकने
आरमोरी, जि गडचिरोली
=========
0
4
8
2
8
6



