Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

कुठे शोधू तुला

राजश्री मिसाळ ढाकणे जिल्हा बीड

0 5 1 7 8 7

कुठे शोधू तुला

कुठे शोधू काळजाचा तुकडा
हरवला कुठं बाळाचा मुखडा…!!

विरहवेदनांची काळजात कळ
कसे आणू देवा जगण्याला बळ…!!

घर वाटे सुनेसुने बाळा तुजविना
दुःख खोल हृदयाचे सांगू कोणा…!!

रात्रभर स्वप्नात भेटतोस तू जेव्हा
जाग येऊन कळते हा भास तेव्हा…!!

कुठेही गेले तरी नजर शोधी तुला
फक्त विरह वाहे अश्रूतून नयनाला…!!

सकाळी असायचे तुझे बोल पहिले
ऐकण्यास आता आतुर कान झाले…!!

सण उत्सवात वाटते हरवले काय?
तुझ्या आवडीचे खावेसे वाटत नाय..!!

क्रूर नियतीने क्षणात टाकला फासा
मिठीत माझ्या श्वास हिरावला कसा??

तुझी सर्व स्वप्ने अर्ध्यावर मोडली कशी
मायलेकराची ताटातूट देवा का रे अशी?

पोटच्या गोळ्याचा मोठा दुःख भार
कुठे शोधू तुला जगणे मुश्किल फार…!!

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे