
0
6
5
5
8
6
भाऊबीज
भाऊ बहिणीचा । सण भाऊबीज ।
खास दिन आज । औक्षणाचा ॥१॥
बहिण भावाचे । पवित्र बंधन ।
आनंदाचा क्षण । ममतेचा ॥२॥
पाहुन भावाला । हर्ष मना होई ।
लगबग घाई । स्वागताची ॥३॥
भाऊ पाठीराखा । करीतो रक्षण ।
देतो संरक्षण । बहिणीला ॥४॥
यम व्दितीयेचा । दिवस आजचा ।
निखळ नात्याचा । दिवाळीचा ॥५॥
सौख्याची लकेर । माया फुलवते ।
अंतरी उठते । आपुलकी ॥६॥
आरतीच्या ताटी । घाली ओवाळणी ।
करी विनवणी । राहा क्षेम ॥७॥
स्नेहाच्या तबकी । निरांजन वात ।
सर्वांवर मात । करीतसे ॥८॥
सुख समाधान । प्रेमाचा दीपक ।
मागणे माफक । मागे नीला ॥९॥
श्रीमती नीला पाटणकर
शिकागो
========
0
6
5
5
8
6



