0
4
8
2
9
3
सुंदर नातं
प्रत्येकाचं एक विश्व असतं
कोणत्याही नात्याच्या परे भासतं
नसतात कोणतीच बंधने अटी
आपसूकच ते जुळत असतं
क्षितिजाच्या पलिकडे झेपावतं
ह्रदयाच्या कुपीत विसावतं
जपून सारे बंध समाजाचे
नकळत मनामनात हसतं
नसतेच कधी अपेक्षा कशाची
निस्वार्थ प्रेमाने चेहऱ्यावर उमलतं
धर्म, जात, पंथ नव्हे रक्ताच्याही परे
मनामध्ये हळूच डोकावतं
दूर किती अंतर जरी
संवेदनांवर पाऊल पाऊल चालतं
सत्य असे किती कटू
डोळे उघडण्या भाग पाडतं
असंच उगाच निवांत क्षणी
हसू ओठांवर कुठून विसावतं
दुसरं तिसरं काही नाही
मैत्रीच सुंदर नातं असतं
शर्मिला देशमुख -घुमरे,
ता.केज जि.बीड
========
0
4
8
2
9
3



