
0
4
0
9
0
3
स्पर्श तुझ्या प्रेमाचा
स्पर्श तुझ्या प्रेमाचा झाला
नजरेला नजर खुणावली
गालावरची खळी उमलली
पापणी लव लव करत झुकली
पहिल्या भेटीतच आपण
एकमेकाच्या प्रेमात पडलो
मनातील कळीफुलून आली
स्पर्श तुझ्या प्रेमान फुललो
मोहिनी मनाला तू घातली
बिलगुण मिठीत तुजला घेतली
उबदार तुझी ती काया
हृदयात धडधड होऊ लागली
तुझ्या बोलक्या रूपातील
डोळ्यातून प्रीत ओसंडून वाहत
प्रेमाने मन प्रसन्न झाले
मनभावना झाल्या आनंदीत
आयुष्य माझे बहरून गेले
मुलाबाळांनी घर उजळले
यशस्वी दोघे झालो जीवनात
यशाच्या शिखर आज मिळाले
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
0
9
0
3





