
0
4
0
8
9
0
पाठांतर
चला गड्यांनो आज
वेळ आहे अवांतर
सारे मिळून आपण
करूया पाठांतर ||
बाईंनी सांगितली
कविता लई छान
तालासुरात नाचत
साऱ्यांनी पकडली तान ||
चिंटू सांगे साऱ्यांना
पाढे पाठ करू
गुणाकार भागाकार
हवेतच मस्त करू ||
आठवड्याचे वार
वर्षाचे महिने बारा
सर्वांनी सांगायचे
नाहीतर चढेल पारा
जाता जाता सर म्हणे
अभ्यास करा निरंतर
वार्षिक परीक्षेची
भीती होईल छुमंतर ||
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
========
0
4
0
8
9
0





