0
4
8
2
9
3
दिल्ली
विकासाच्या वाटेवर
लावतात गतीरोध।
आवाज कोंडून जना
होतात बिनविरोध।।
या लोकशाहीची थट्टा
करतात आनंदाने।
अक्कल गहाण केली
मिरवी अभिमानाने।।
स्वार्थासाठी माणसाने
निर्मिली ही व्यवस्था।
लेकरं मानत नाही
बापाची दैना अवस्था।।
संविधानाचे पाईक
म्हणावे आज कोणाला।
सख्खा भाऊच भावाला
समजतो बघा साला।।
माणूसकीची उडवी
खुलेआम लोक खिल्ली।
तरी बिचारी मावली
चुपचाप माझी दिल्ली।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा जि,यवतमाळ
========
0
4
8
2
9
3



