0
4
8
2
9
7
बेत
पुस्तकांच्या ढिगा-यातून
विचारांचे ढेकूण बाहेर निघून पळत आहेत सैरभर …!
संस्कृतीच्या फरताळात कित्येक युगापासून जमलेली जळमटं आता साफ करावी लागतील…!
खुप दिवसांपासून बंद आहे हे जीर्ण ग्रंथालय
गंज चढलाय त्याच्या कुलूपावर
तांबडेफक्कट पडलेत त्याचे कडीकोंडे
रॉकेल टाकून साफ करावं लागल अगोदर..!
दाराची चौकटही कुरकुरते अधून मधून
तासून करावी लागेल सरळ तीसुद्धा!
भिंतीवर महापुरूषांच्या फोटोंची झालीय गर्दी ..
हारातली फुलं वाळून गेलीत केव्हाच
आणि कोळ्यांनी टाकलेत जाळे सगळ्यांवर….
त्यांना या जाळ्यातून करावं लागेलमोकळं !
लोकशाहीच्या तहेखाण्यात अडकलेल्या
स्वातंत्र्याच्या विळख्यातून बाहेर पडलो की ….
हेच करायचा माझा बेत आहे ..!
गोविंद रोकडे
ता. सेलू जि परभणी
0
4
8
2
9
7



