बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक व कार्यकारी संपादक
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*
*🥀विषय : हुंकार*🥀
*🍂बुधवार : २८/ मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हुंकार*
*केव्हाचा साद घालतो तुला*
*सखये!हुंकार दे ना तू*॥
*काहीतरी बोल,मजला स्विकार*
*अथवा नकार दे ना तू*॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
*हुंकार*
गोष्ट सांगणाऱ्याला येतो हुरूप
हुंकार देणारा, कोणी असेल तर,
सरकत जाते कथा नक पुढेपुढे
हुबेहूब वाटे,नाट्य सारं,खरं खरं.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
*हुंकार*
कुणी हुंकार दिला तर
हळू लगेच द्यावी साद,
आई म्हणे शब्द जपा
प्रेम वाढेल नको वाद.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
*हुंकार*
तेजस्वी चंदेरी चंद्र कलासम
बाळ मोठा होऊ लागला
हाकेला देई हुंकार प्रतिसाद
निरागस नयनी हास्यभाव दिसला
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हुंकार*
वेदनेचा हुंकार ऐकून
पाऊस आला भेटीसाठी
ग्रीष्मात रापलेल्या धरेला
त्याने दिलीय घट्ट मिठी.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
*हुंकार*
जगी श्रेष्ठ आहे मातृत्वाचा हुंकार
लेकराची हाक येता कधी नसे नकार
वृद्धापकाळी माता पिता बनु नये भार
आयुष्यभर कुटुंबासाठी झीजले अपार
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
*हुंकार*
सतत सलत राही
दुखरा कोपरा मनाचा
दाटलेल्या भावनांनी
ऐक हुंकार या जीवाचा
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🟢💥➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





