सासवणे भेटीत महात्माजींना “पोरबंदर” आठवले
लेखक - बळवंत वालेकर
सासवणे भेटीत महात्माजींना “पोरबंदर” आठवले
( लेखक – बळवंत वालेकर)
संकलन: तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
आज २ आॕक्टोबर २०२५ महात्मा
गांधीजींची १५६ वी जयंती आहे . महात्माजींचा जन्म २ आॕक्टोबर १८६९ रोजी गुजरात प्रांतातील
पोरबंदर येथे झाला.बापूजींची जयंती भारतातच नव्हे तर विदेशातही साजरी होते . त्यांचे मोठेपण बॕरिष्टर होण्यात नाही तर स्वावलंबी जीवन , साधी राहणी , साधा पोशाख ( फक्त खादीचा पंचा ) व हलक्या दर्जाची कामे (शौचकूप सफाई ) करणे आणि अनवाणी चालणे यात आहे . माझा देश गरीब आहे. जनतेची अन्नान्न दशा आहे .
लज्जा रक्षणार्थ कपडे नाहीत , काहींना नि वा-यासाठी झौपडीही नाही . म्हणून *बॕरिष्टर* असलेल्या बापूजीँनी ऐशारामी जीवनास फाटा देऊन साधी राहणी व अनवाणी फिरणे हे व्रत स्वीकारले.
अहिंसा मार्गाने लढा देऊन देश
*स्वतंत्र* करणे ही त्यांची अंतिमेच्छा होती .
*बापूजींनी कोट खुंटीला टाँगला*
मूलतः बापूजी कायदा शाखेचे विद्यार्थी . कायद्याची सर्वोच्च पदवी घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले . व *बॕरिष्टर* होताच मायभूमीत परतले . पहिल्यांदाच एका अशिलाची केस लढविण्या साठी ते मुंबई हायकोर्टाच्या न्याय कक्षात *काळा कोट परिधान करून गेले . न्यायाधीश येताच कामकाज सुरू झाले. बॕ.मोहनदास करमचंद गांधी
*हे नाव पुकारताच मिष्टर गांधी उभे राहिले पण ते फारच घाबरलेले होते . कोर्टहाॕल त्यांच्या भोवताली फिरल्यासारखे वाटले . . त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडेना. शेवटी ते अपमानित होऊन खाली बसले . आपणास हा व्यवसाय जमणार नाही असे समजून त्यांनी काळाकोट* भिंतीला टाँगला. व वकिली व्यवसायास *राम राम* ठोकला.
नंतर त्यांनी आफ्रिकेचा रस्ता पकडला . तेथे काळ्या लोकांवर होणारा अन्याय अहिंसेच्या मार्गाने दूर केला व स्वातंत्र्य चळवळ बळकट करण्यासाठी भारतात परतले . स्वावलंबनाचा , सत्याग्रहाचा व *खादी* चा सर्वत्र
*प्रचार केला . राष्ट्रीय व्रुत्ती तरुणाँच्या रोमारोमात रुजण्यासाठी राष्ट्रीय शाळांना भेटी देऊन संस्था चालकांना , विद्यार्थ्यांना व ग्रामस्थाँना प्रोत्साहित करू लागले . वैश्य समाजाने कुलाबा जिल्ह्यातील सासवणे* येथे राष्ट्रीय निवासीशाळा चालविली होती . या राष्ट्रीय शाळेचा लौकिक सर्वत्र पसरल्यामुळे अनेक नेत्यांनी भेटीही दिल्या होत्या. भारताचे पोलादी पुरूष व स्वतंत्र भारताचे पहिले ग्रुहमँत्री सरदार वल्लभभाई पटेल* आणि उद्योगपती *जमनालाल बजाज* यांच्या भेटीमुळे बापूजी
या राष्ट्रीय शाळेस भेट देण्यास आतुर झाले होते .
*सासवणे भेटीत बापूजींना “पोरबंदर “आठवले*
सासवणे हे पुराणकालीन अष्टागरातील *निसर्ग रमणीय गाव आहे . सागरसान्निध्यामुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे .ब्रिटिशांची *काळी* कारकीर्द नष्ट होण्यासाठी , स्वातंत्र्य प्रेमी पिढी निर्माण व्हावी या हेतूने
*आचार्य ढवण* यांनी वैश्य समाजामार्फत निवासी शाळा सुरू केली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ७० विद्यार्थी अध्ययन करीत होते . या निवासी शाळेत वैश्य समाजातील मुलांना भोजन व निवास सेवा मोफत होती . अन्य जातीच्या मुलांनाही येथे शिक्षणासाठी मुक्त प्रवेश . होता . या शाळेत भाषा , गणित , शास्त्र या विषयांसोबत स्वावलंबन , श्रममूल्य , संस्क्रुतीची जपणूक , स्वयंशिस्त , चरख्यावर सूत कातणे यास प्राधान्य होते . शारीरिक क्षमतेसा ठी कुस्ती , मल्लखांब , दंड बैठका , दांडपट्टा , लःगडी , खोखो , हुतुतु यांचा दैनंदिन सराव होत असे. येथे सुतकताई सक्तीची होती तर मुलींना स्वयंपाक करावाच लागे. या निवासीशाळेस बापूजींनी १९२७ साली भेट दिली . सागर दर्शन , लाटा़ंचा खाळखळाट , बोचरी थंडी , नारळी – पोफळींचा सुळसुळाट अनुभवताच त्यांना *पोरबंदर*
( मात्रुभू)मी )ची आठवण झाली . सतत दौरे , व कार्यक्रम असल्यामुळे पोरबःदरला जाणे होत नव्हते . म्हणून सासवणे हेच पोरबंदर समजुन एक दिवसासाठी आलेले बापूजी चार दिव स थांबले . लगेचच त्यांनी सागरकिनारी मुलांच्या मदतीने *कुटी** बांधली . शेजारी शौचकूपही उभारले . ४ दिवसांच्या मुक्कामात बापूजींना स्वयंपाक करण्यास , चरख्यावर सूत कातण्यास , देशभक्तीपर गाणी व प्रार्थना म्हणण्यास अनेक मुला – मुलींनी मदत केली . (बापूँजींचा सहवास लाभलेली मुले स्वतःला भाग्यवान समजत. ) त्यात श्रीमती ताराबाई दशरथ शेट्ये
( पूर्वाश्रमीच्या ताराबाई गोविंद लाड आणि श्रीमती उषा हरिश्चंद्र भिंगार्डे
( पूर्वाश्रमीच्या उषा जगन्नाथ ढवण) या विद्यार्थिनी बापूंच्या विशेष आवडत्या होत्या, ( सदर लेखकाने दोन दशाकांपूर्वी या भाग्यवान महिलांची सासवणे येथे प्रत्यक्ष भेट घेऊन बापूजींच्या सासवणे भेटीबाबत चर्चा केली होती . ) *राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या या आश्रमशाळेस ब्रिटिश शासनाकडून मान्यता मिळणे मुश्किल होते . पण पुणे येथील *टिळक महाराष्ट्र विद्यापीठ* ने या शाळेस मान्यता (recognition ) दिल्यामुळे शाळाचालकांची *मोठी चिंता* दूर झाली शिवाय शाळेचा पटही वाढला. या शाळेत चिंतामणशास्त्री जोशी , ग. य. म्हसकर , नाना काणे., पाटणे , धामणसकर , रामजी घरत , काशिनाथ सारदळकर , हे दिग्गज विद्यादानाचे पवित्र काम
*विनावेतन* करीत . शिवाय हे शिक्षक बापूजीँच्या विचाराने झपाटलेले होते . म्हणून या *राष्ट्रीय * शाळेवर ब्रिटिशांची करडी नजर चोवीस तास होती .
*”तपस्वी” घरत यांनी ब्रिटिश पार्लमेंट हादरविली*
रामजी लक्ष्मण घरत हा धडपड्या तरूण पदवीधर होता . इंग्रजी भाषेवर “कमांड”” होती . बापूजींचा आवडता अनुयायी होता . गावातील प्रत्येक कार्यक्रमात त्याचा सहभाग होता . आश्रमशाळेतही अध्यापन करीत होता . ब्रिटिशांनी वाढविलेला शेतसारा ऐकून तो गर्भगळित होत असे. या एकाधिकारशाहीस *वाचा*फोडण्यासाठी “टाईम्स आॕफ इंडिया” या इंग्रजी व्रुत्तपत्रात लैखमाला सुरू केली . या लेखमालेचे पडसाद इँग्लंडच्या पार्लमेँटमध्ये उमटले. म्हणून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पार्लमें टने प्रतिनिधी भारतात पाठविला . या प्र तिनिधीने सासवणे गावास भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांशी शेतसा-याबाबत चर्चा केली व अहवाल पार्लमेंटला सादर केला . शेवटी वाढीव शेतसारा ब्रिटिश सरकारला रद्द करावा लागला . हा *तपस्वी* घरत यांच्या लेखणीचा विजय आहे
*मीठ सत्याग्रहात आश्रमशाळा सामील*
विविध प्रकारचे कर लादून . ब्रिटिशांनी भारतीयांना बेजार केले होते . बापूजी या करवाढीस अहिंसेच्यामार्गाने विरोध करीत . *मीठ** या जीवनावश्यक वस्तूवरही ब्रिटिश सरकारने कर लावला . या हुकूमशाही व्रुत्तीस विरोध करण्यासाठी बापूजींनी *मीठसत्याग्रह* करण्याचे जाहीर केले , बापूजींच्या या आवाहनास हजारो युवक -युवतीँकडून प्रतिसाद मिळाला . त्यात सासवणे आश्रमशाळाही मागे नव्हती . विद्यार्थी , शिक्षक व ग्रामस्थांची एक तुकडी लगेचच पोरबंदरला रवाना झाली . *काळ्या* यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या सासवणे शाळेच्या तुकडीस पोलिसांनी लगेचच पकडले . त्यात आश्रमशाळेचे विद्यार्थी व शिक्षक आढळल्यामुळे पोलिस चिडले. व त्यांनी आश्रमशाळेची मान्यता लगेचच रद्द केली .
स्वातंत्र्यप्रेमीपिढी निर्माण होण्यासाठी वैश्य समाजाने निवासीशाळा चालविली होती . .वैश्य मुलांना भोजन व निवास मोफत होते . त्यासाठी या समाजाने हजारो रुपयांचा निधी जमविला होता . . पण या निवासी शाळेची मान्यता ब्रिटिशांनी पूर्वग्रह दूषिततेने काढून घेतल्यामुळे वैश्य समाजास मोठा धक्का बसला . वैश्य मुलांनी शाळेस रामराम ठोकला. इतर समाजातील मुलांनी कुलाबा जिल्हा
स्कूल बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेतला . पण वै श्य समाजातील मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला . ब्रिटिश सत्ता असेपर्यंत शाळेला मान्यता मिळणे अशक्य होते . सुदैवाने १५ आॕगष्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यामुळे भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला . देश स्वतंत्र झाल्यामुळे आश्रमशाळेस मान्यता मिळण्याची शक्यता वाढली . वैश्य समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या. परंतु ३० जानेवारी १९४८ रोजी महात्माजींवर गोळ्या झाडल्यामुळे त्यांना हौतात्म्य मिळाले . व संपूर्ण भारत देश दुःख सागरात बुडाला. सर्वत्र शोकसभा सुरू झाल्या . पण फक्त *शोक* नको. बापूजींच्या स्म्रुतीसाठी
*विधायक काम* करणे गरजेचे आहे , आश्रमशाळेची मान्यता जाऊन अनेक वर्षे झाल्यामुळे त्याठिकाणी नवीन शा ळा चालविणे कठीण आहे . म्हणून *इमारतींसह जागा शासनाच्या ताब्यात देऊन* या जागेचा वापर * विद्यार्जनासाठी**( प्राथमिक अगर माध्यमिक शाळा काढावी किंवा महाविद्यालय चालवावे ) करवा असे वैश्य समाजाने ठरविले व पूर्ततेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री *बाळासाहेब खेर* यांच्या गाठी -भेटी सुरू झाल्या .
*बापूजी स्वर्गात अश्रू ढाळत असतील*
दि. ३० जानेवारी १९४९ रोजी
(महात्मा गांधीजींची प्रथम पुण्यतिथी
दिनी) वैश्य समाजाचे प्रतिनिधी व मुंबई राज्याचै मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्यामध्ये *शाळेच्या इमारती व जागा विद्यार्जनाच्या वापरासाठी* असा लेखी करार झाल्यानंतर शासनास इमारतींचा ताबाही दिला गेला . त्यानंतर काही वर्षांनी मुलींचे शासकीय अध्यापक विद्यालय
D. Ed. College) वसतिग्रुहासह सुरू झाले त्यानंतर मुलांचे अध्यापक विद्यालयही चालू झाले .पण शिक्षक भरती बंद झाल्यामुळे ‘ “प्रशिक्षणार्थी मिळेनासे झाले . परिणामी अध्यापक विद्यालय शासनाने बंद केले म्हणून शासनाने शिक्षण संस्था चालविण्यासाठी . अटी – शर्तींसह द्याव्यात असे वैश्य समाजाने ठरविले व जागेसह इमारती शासनाकडे सुपूर्द कराव्यात असा लेखी करार ही झाला . पण शासनाने करार भंग केला . विद्यार्जनासाठी इमारतींचा वापर न करता शिक्षण विभागाचे जिल्हास्तरीय कार्यालय त्या इमारतींमध्ये थाटले. अशाप्रकारे शासनाने आटींचा भंग करून वैश्य समाजाची फसवणूक केली. या फसवणुकीमुळे राष्ट्रपिता महात्माजी स्वर्गातून अश्रू ढाळत असतील.





