शालिनीताई शांताराम देवरे यांच्या “आभाळमाया” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
विनय कुमार देवरे यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचे आयोजन
शालिनीताई शांताराम देवरे यांच्या “आभाळमाया” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न
विनय कुमार देवरे यांच्या सेवानिवृत्ती सत्काराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक: दिनांक 03/08/ 2025 रविवार रोजी कवयित्री श्रीमती. शालिनीताई शांताराम देवरे यांचा द्वितीय पुस्तक “आभाळमाया” चा प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री. महेश बच्छाव साहेब. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रवींद्र पाटील व श्री. कैलास बापू चुंबळे होते . प्रमुख अतिथी श्री. महेश साहेब, श्रीमती शालिनी देवरे व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले .
त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “आभाळमाया” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कवयित्री श्रीमती शालिनी देवरे यांच्याविषयी श्री. किरण पाटील, श्री विनोद खरडे,श्री.विनय देवरे, सौ.प्रांजली पाटील, श्री महेंद्र देवरे, श्री निलेश मगर ,श्री भावसार साहेब, श्री सुभाष भदाणे, श्री निलेश धोंडगे, श्री गोकुळ गांगुर्डे या सर्वांनी आपले विचार प्रकट केले.
हा कार्यक्रम म्हणजे दुग्धशर्करा योग होता. एक कवयित्री ताईंच्या मुलगा श्री विनय कुमार देवरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. या कार्यक्रमात त्यांचे संपूर्ण कुटुंब व आप्तेष्टांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.



