Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

आचरण

गोवर्धन तेलंग पांढरकवडा.जि यवतमाळ

0 4 8 2 8 4

आचरण

आन बान शान ,आपला तिरंगा।
करु नका आता आपसात दंगा।।

हिरवा पांढरा , केशरी नटला।
अशोक चक्राने निर्मळली गंगा।।

धर्म मोठा नाही,टाळ तुझा वाद।
श्रेष्ठ आचरण ,बसावे सत्संगा।।

हिंदू शिख जैन,मुस्लिम बौध्दांनी।
समान मानावे ,का घ्यायचा पंगा।।

ईश्वराची भक्ती,खरी देशभक्ती।
वारकरी होवू , वंदूया पांडुरंगा।।

विचार आचार, बा भीमाचे खरे।
मानवतावादी ,बुध्दाचेच संगा।।

कपटी मनाने ,जगू नये कोणी।
समाज नांदेल,बघा हर्ष चंगा।।

संविधान आहे,भारताची गाथा।
हाच ज्ञानमार्ग,गाऊया अभंगा।।

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे