
0
4
8
2
8
4
तुझ्या रुपाचं चांदणं
तुझ्या रूपाचं चांदणं
माझ्या मनात पडलंय
तुझ्या प्रीतीच गुपीत
सखे मला ग कळलंय
येते स्वप्नात तू माझ्या
सहवास तुझा चांदरातीला
सुनसान या एकांत क्षणी
सखे येते तू मज भेटीला
जादू तुझ्या नजरेची
घायाळ मी झालोय ग
तुझ्या आंधळ्या प्रेमात
असा फसत मी गेलोय ग
तुझा श्रृंगार ग पाऊण
वेड्यापरी मी झालोय
प्रेम व्यक्त करण्यास
गुलाब घेऊन आलोय
तुझ्या रुपाचं चांदणं
आला प्रीतीला बहर
झालो तुझाच मी सखे
आता देऊ नको तू नकार
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
4
8
2
8
4



