Breaking
कविताकोकणनागपूरपुणेसाहित्यगंध

गंध फुलांचा गेला सांगून; पांडुरंग घोलप

पुणे

0 4 8 2 9 3

गंध फुलांचा गेला सांगून

पहिल्याच आपल्या भेटीत
सारे क्षण गेले मोहून
तुझी माझी प्रीत सुगंधी
गंध फुलांचा गेला सांगून ||१||

या फुलांच्या ओवून माळा
दारी घराच्या आपण लावू
एकमेकांच्या सोबतीनेच
संसाराची नवी स्वप्ने पाहू ||२||

तू माझी अन् तुझाच मी
एकमेकांसाठीच हे जीणे
सोबत एक दुसर्‍याची तर
राहील काय मग उणे? ||३||

सुखदुःख वाटून घेऊ
संकटात देऊ हात
सुखाचे क्षण शोधू
दुःखावर करू मात ||४||

दिलास जर तुझा हात
विश्वासाने माझ्या हाती
जुळून येतील रेशीमगाठी
सुरू होतील प्रेमळ नाती ||५||

गंध फुलांचा गेला सांगून
तुझ्यामाझ्या बोल कानी
मी तुझ्याच दिलाचा राजा
तू माझीच गं फुलराणी ||६||

चल प्रेमाचा करू स्विकार
न मागता आले मिळून
आयुष्यभराचे सोबती आपण
गंध फुलांचा गेले सांगून ||७||

पांडुरंग एकनाथ घोलप
मु.पो.रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे