
0
5
4
7
7
9
शिल्पकार
काळाकुट्ट अंधार जीवनाचा
दूर केला प्रज्ञासूर्य बाबांनी
कासरा मोकळाच गळ्याचा
बंद ते डागणे शब्दबाणांनी
मुक्तीपथ बांधला मानवतेचा
चौकटी त्या हिंमतीने तोडून
शिल्पकार थोर संविधानाचा
बाबा अभिवादन हात जोडून
सामना तो भयाण वादळांचा
प्रज्ञा,शील,करूणा दाखवून
शिल्पकार खरा स्वातंत्र्याचा
बौद्ध तत्वांची फळे चाखवून
अनिष्ट,दुष्ट प्रथांना नाही थारा
विचार रूजविला तो शांतीचा
सुखाचे चांदणे नि अंगणी वारा
उद्धारक सामाजिक क्रांतीचा
महामानवाच्या चरणी माथा
झुकलेला माझा सदैव असेल
शिल्पकारा ती संविधानगाथा
घरोघरी अभ्यासताना दिसेल
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
5
4
7
7
9



