Breaking
क्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजीनगरपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ विशेषांकाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी केले स्वागत

वसुधा नाईक, प्रतिनिधी

0 5 7 2 9 4

‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ विशेषांकाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी केले स्वागत

वसुधा नाईक, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

छ.संभाजी नगर, (दि २६ जुलै): फुलंब्री तालुक्याच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी “स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६” या स्त्रीशक्ती मंचाच्या चौथ्या वार्षिक विशेषांकाचे नुकतेच स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील अभ्यासू लेखक, लेखिका, विचारवंत, सामाजिक, प्रशासकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या लेखनाने समृद्ध झालेल्या या विशेषांकात स्त्रीच्या संघर्षापासून स्वराज्यापर्यंतच्या प्रवासाचे विविध अंगांनी प्रकाश टाकण्यात आला आहे.

या अंकाचे मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्यासह महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या स्त्री शक्ती मंचाच्या कार्यकारी संपादक भगिनींचे परिश्रम, समन्वय आणि योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. विशेषांकाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तन आणि वैचारिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी आमदार चव्हाण यांनी विशेषांकाच्या संकल्पना व सामाजिक उपयुक्ततेबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी सचिन मोटे तसेच आमदारांच्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे