
0
6
2
9
0
4
जिवलगा
जिवलगा तुझ्या डोळ्यांत
माझं सगळं आकाश आहे
तुझ्या एका स्मित हास्यात
माझ्या जगण्याचा श्वास आहे
तू भेटलास तेव्हापासून
वेळही थांबला आहे
तुझ्या नावाशिवाय आता
शब्दही अबोल आहे
तुझ्या हाताचा स्पर्श
जसा पहाटेचा वारा
तुझ्या कुशीत विसावते
माझ्या स्वप्नांचा किनारा
जिवलगा एकच मागणं
आयुष्यभर सोबत राहा
सुखात-दुःखात तू
माझाच होऊन राहा
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि. चंद्रपूर
=======
0
6
2
9
0
4



