कवितानागपूरबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
चक्रीवादळ; राजश्री ढाकणे-मिसाळ
0
4
8
3
0
0
चक्रीवादळ
जे का रंजले गांजले
धैर्याची नित्य कसोटी
संकटाशी दोन हात
न्यारी ज्यांची हातोटी…!!
स्वाभिमानी सुसंस्कृत
सोडविती जीवनकोडे
दुःख खोल काळजात
परि पाऊल टाकी पुढे…!!
सत्याला वाली नसतो
असत्याचा जयजयकार
हरिश्चंद्राला मिळतो येथे
तोंड दाबून बुक्याचा मार…!!
इवलासा आशेचा किरण
संघर्षाच्या जगण्याचे बळ
गर्भश्रीमंत आनंदी कोणी
समजेल का कष्टाचे फळ…!!
श्रीमंताच्याच नवसाला
देवा तू नेहमी पावतोस
जिद्द, संयम धैर्याला तू
चक्रीवादळ दाखवतोस..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
तालुका,जि.बीड
=========
0
4
8
3
0
0



