Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

उभं राहा पुन्हा

अंकुश सालपे जिल्हा नागपूर

0 5 4 7 7 9

उभं राहा पुन्हा

पडणं हे नशिबात, पण उठणं तुझ्या हातात,
‎हार मानणं नाही कधी, ठेऊ नकोस मनात।
‎वादळं कितीही आली, तरी थांबू नकोस तू,
‎स्वप्नांच्या त्या दिशेने, चालत राहा तू।

‎रस्ता जरी कठीण, तरी पाऊल टाक पुढे,
‎अंधाराच्या पल्याडच उजेड असतो खरे।
‎घामाच्या त्या थेंबातून यश उमलतं हळू,
‎प्रयत्नांच्या जोरावरच नशीब वळतं बघू।

‎लोक काय म्हणतील हे मनातून काढून टाक,
‎स्वतःच्या हिंमतीवर ठेव नेहमीच विश्वास ठाम।
‎हरलास तरी काही नाही, शिकणं महत्वाचं,
‎प्रत्येक अपयशातूनच यशाचं दार उघडतं।

‎आज जरी थकलास तरी थांबू नकोस इथे,
‎उद्याचा तो सूर्य तुझ्यासाठीच उगवते।
‎जिद्द, मेहनत, धैर्य ठेव मनाच्या आत,
‎तूच घडवशील तुझं भविष्य तुझ्या हातात।

अंकुश सालपे
जिल्हा नागपूर

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 7 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे