Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

श्री समर्थ विचार फाउंडेशन तर्फे आदर्श मातांचा गौरव; ‘स्मृति दर्पण’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 1 1 8 5

श्री समर्थ विचार फाउंडेशन तर्फे
आदर्श मातांचा गौरव; ‘स्मृति दर्पण’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग | प्रतिनिधी : मातृत्व, कर्तृत्व आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा ‘आदर्श माता पुरस्कार’ तसेच ‘स्मृति दर्पण’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगडच्या वतीने अलिबाग येथील सन्मान हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ मातांचा मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श माता गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपनगराध्यक्ष अँड. मानसी म्हात्रे, आदर्श बँकेचे संस्थापक सुरेश पाटील, अँड. प्रवीण ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नगरसेवक अँड. अंकित बंगेरा, डॉ. संदेश पाटील आणि श्री समर्थ विचार फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. रत्नाकर पाटील यांच्या हस्ते ‘स्मृति दर्पण’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १५ मातांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सन्मानित मातांमध्ये सुनिता नाईक, मालती ठाकूर, पार्वती पाटील, महानंदा वर्तक, अनिता नाईक, गुलाब गायकवाड, आशाबाई म्हात्रे, ललिता बंगेरा, सुचेता पाटील, शारदा पाटील, इंदिरा भगत, सुलोचना पाटील, मनोरमा पाटील, इंदुमती पाटील आणि उर्मिला ठाकूर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. रत्नाकर पाटील यांनी केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, अँड. मानसी म्हात्रे, अँड. प्रवीण ठाकूर, अमित नाईक, मंदार वर्तक, डॉ. महानंदा म्हात्रे, अँड. अंकित बंगेरा, अभिजीत पाटील आणि पूनम म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करत सन्मानित मातांचे कौतुक केले.

मातृत्व ही केवळ कुटुंबाची जबाबदारी नसून समाज घडविण्याची मोठी शक्ती आहे. आपल्या कुटुंबासोबतच समाजासाठी योगदान देणाऱ्या मातांचा गौरव होणे ही अभिमानाची बाब असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केले, तर आभार अँड. विजय पाटील यांनी मानले. या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पुरस्कार प्राप्त मातांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे