0
4
0
9
0
3
मन वेडे
मन वेडे सैरभैर
फिरे दहाही दिशेला
नाही आवरे कशानी
जाई मोकळ्या वाटेला
कधी जाई आकाशात
स्पर्शे चंद्र तारकांना
क्षणी येई धरेवर
थांग कशाचा लागेना
फिरे रानोरानी मस्त
जसं मोकाट पिसाट
किती आवरता याला
याची औकात अफाट
खेळे नदीच्या पाण्याशी
जाई रंगात रंगुन
कधी गाणे गुणगुण
झुले तालात येऊन
कधी सुक्ष्म रूप घेई
लपे अंतरी स्वरूप
कधी विशाल आकारी
दावी दिव्यत्वाचे रूप
मोह,माया पाश सारे
तोडा एकाग्र होऊन
मन येईल काबुत
जाता ईश्वरा शरण
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
9
0
3





