Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

देवदेवेश्वर संस्थानच्यावतीने पर्वतीवर थोरले बाजीराव पेशवे यांचे पुण्यस्मरण

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 0

देवदेवेश्वर संस्थानच्यावतीने पर्वतीवर थोरले बाजीराव पेशवे यांचे पुण्यस्मरण

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे.दि.28 (प्रतिनिधी) अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची २८५ वी पुण्यतिथी सोमवार दि. 28 एप्रिल रोजी पर्वतीवरील बाजीरावांच्या पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली. मध्य प्रदेशातील नर्मदा किनारी असलेल्या रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्यांनी आपला देह ठेवला होता. त्या घटनेला आता २८५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त व पेशवे घराण्याचे वंशज पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते बाजीराव पेशव्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संस्थानच्या वतीने पर्वतीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांच्यासह सुधीर पंडित, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी हे विश्वस्त मंडळ , संस्थान अंतर्गत येणारे सारसबाग , पर्वती व कोथरूड येथील मंदिर समितीचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दै. मुं तरूण भारतशी बोलताना संस्थानचे विश्वस्त, ईतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी थोरल्या बाजीरावांच्या जीवनभरच्या विजयी युध्द मोहिमां आणि अजिंक्य योध्दा म्हणून ईतिहासात सुवर्ण अक्षराने झालेली नोंद याबद्दलची माहिती दिली. सध्या पेहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधू जल कराराला केंद्र सरकारने दिलेल्या स्थगितीचा संदर्भ देऊन त्यांनी थोरले बाजीराव पेशव्यांनी राबवलेले पाणी धोरण व राजनीती यांचे धागे जळुवून ईतिहासातील पालखेड लढाईच्या घटनेची आठवण जागी केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या पालखेड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी बलाढ्य अशा निजामाची अन्नधान्य, दाणा-वैरण यांची रसद आणि मुख्य म्हणजे पाणी तोडून चारही बाजूने कोंडी केली होती. याचाच परीणाम म्हणून २५ फेब्रुवारी १७२८ ला निजामाचा दारुण पराभव झाला. ही पालखेडची लढाई जगाच्या इतिहासात प्रसिध्द असून ती युध्दशास्त्राच्या रणनीतीचे उत्तुंग उदाहरण ठरले. त्याची दखल या युद्धानंतर सव्वादोनशे वर्षाने इंग्रज फिल्डमार्शल मॉन्टगोमरी याने जगातील सर्वोत्कृष्ट लढायांवर लिहिलेल्या ” A Concise History Of Warfare ” या ग्रंथामध्ये आर्वजून घेतली आहे.

अशा पराक्रमी राजाचा ईतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा, म्हणून बाजीराव पेशवे प्रतिष्ठान,पुणे यांच्या वतीने येत्या दि.१० मे रोजी युद्ध स्मारक समितीच्या सहकार्याने पालखेड येथे अजिंक्य योद्धा बाजीरावांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन होणार आहे, अशीही माहिती यावेळी बोलताना श्री. लडकत यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे