स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६३ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६३ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये संस्थेच्या स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात थोर आश्रय दाते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६३ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्व. बाबासाहेब नाजरे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे व सहाय्यक शिक्षक धनराज फड सर यांनी आपल्या मनोगतातून स्व. बाबासाहेब नाजरे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इ. १० वी, इ. ११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे करून स्व. बाबासाहेब नाजरे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर म्हात्रे, खजिनदार सुवर्ण कांबळी, कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारिणी सभासद जयवंत म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंतचे सर्वं विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर आशिष राणे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



