Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*

*🐢स्पर्धेचा विषय : कासवगती🐢*
*🔸मंगळवार : २० / जानेवारी /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*कासवगती*

गुरुजी आले वर्गात
घेतले आमचे पाढे पाठ
सारीच मुले होती
पाठांतरात सपाट …१

सुरू झाला दुसरा
तास आमचा मराठीचा
किंचितही गंध नव्हता
कुणालाच व्याकरणाचा …२

तिसरा तास रोजचा
हिंदी राष्ट्रभाषेचा
काही करता सुटेना
तिढा मराठी वळणाचा …३

तास इंग्रजी विषयाचा
बारा काळात एका वाक्याला
चालवावे कसे या कोड्याने
सारा वर्ग चिडीचूप बसला …४

मग आले आमचे गुरुजी
इतिहास शिकवायला
इसवीसन घटना पाठांतर
लावते हो नेहमीच रडायला …५

विज्ञानातील प्रयोग
करावे कसे सुचेना
चंचुपात्र परीक्षानळी
कशासाठी तेच कळेना …६

भूगोलाच्या तासाने तर
डोके फिरले गोलगोल
नकाशवाचन येईना
झाली आमची घालमेल …७

चित्रकलेचा तास तसा
खास आम्हाला वाटला
चित्र सांगितले अवघड
उत्साह सारा मावळला …८

एकदाचा सुरू झाला
आवडता खेळाचा तास
मोकळा केला साऱ्यांनीच
गुदमरलेला हो श्वास …९

डोक्यावर हात मारून
वैतागून वदले गुरुजी
अभ्यासातील कासवगती
कशी होईल हो प्रगती
कशी होईल हो प्रगती…१०

*डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, छ. संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️
*कासवगती*

कासवगती धिमी
जिंकतो शर्यत
कुठे नाही कमी
करी ससुल्यावर मात ॥१॥

शोभे लक्ष्मीचे प्रतिक
कासव अति महान
प्रजाती अनेक
दिसे मंदिरा समोर छान ॥२॥

भारतीय संस्कृती करते
घरोघरी पूजन
श्रध्दा भावाने ते
करतात जतन ॥३॥

प्रजातीची विविध नावे
कुर्म कासव म्हणती
कुणीना करी कावे
सन्मानाने करती गणती ॥४॥

प्रकृतीचे आहे वरदान
कवच कडक
अनमोल लाभले दान
स्वतःचे ते रक्षक ॥५॥

डोक,मान,धड दिसे
फारच मनमोहक
शेपूट सुंदर असे
स्वभाव त्याचा नेक ॥६॥

मंद कासवगती
विष्णूचा अवतार
गुंग करते मती
अमूल्य ठेवा अपार ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️
[*कासवगती*

गुरुजी एकदा वर्गामध्ये
सांगत होते गोष्ट
आवाजातील चढउतार
उच्चार होते स्पष्ट ॥

गोष्ट सांगता सांगता
प्रश्नांचा तो भडीमार
उत्तर द्यावे कसे म्हणून
मागची मुलं थंडीगार ॥

गुरुजी म्हणाले बाळांनो
सारेच असतात हुशार
आत्मविश्वास मनी ठेवा
होवू नका पसार ॥

कासवगती आठवून पहा
अभ्यास रोज करीत रहा
धावता धावता थांबण्यापेक्षा
न थांबता चालत रहा ॥

परिवलन, परिभ्रमण
पृथ्वीचा खेळ चाले जसा
सातत्य आणि सरावाने
यशाचा शिखर गाठू तसा ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कासवगती*

राजू अभ्यासात कासवगती
शिकविले ते कळेना
अभ्यासात लक्ष लागेना
डोके त्याचे चालेना

मैदानी खेळात हुशार
आज्ञाधारकतेचा तुषार
मदत करण्यास तो पुढे
निर्मळ मन त्याचे कडे

गुरूजींनी सांगीतली कथा
कासव अन ससा
कासवाचा वेग कमी
जिंकतो कासव कसा

राजूने घेतले मनावर
अभ्यासावर दिला भर
परीक्षेत आला नंबर वन
कासवगतीला दिला पळ

*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*बंधुनगर झिंगाबाई टाकळी नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️
*कासवगती*

कासवाची चाल हळूहळू
ससा चाले तुरुतुरु
तरीही दोघांची
शर्यत झाली सुरू .

ससा राहिला गाफील
शर्यत जिंकणार मीच
रमत गमत चालला
चूक झाली हीच.

ध्येय गाठणे एकच ध्यास
प्रयत्न करणे आपल्या हाती
नाही इर्षा नाही स्पर्धा
कासव चालले कासवगती.

कुवत असूनही ससा
अहंकाराने हरला.
ध्येयवेडा कासव
जिद्दीने लढला .

नको कुणाचा हेवा दावा
अभ्यासाचा ध्यास हवा
असे कुणी मंदगती
सातत्याने होई प्रगती .

*सौ विमल धर्माधिकारी*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️
*कासवगती*

एक दोन एक दोन एक दोन
सशासी शर्यत लावतंय कोण??

तीन चार तीन चार तीन चार
कासव चालतंय जिद्दीने फार…!!

पाच सहा पाच सहा पाच सहा
कासवाची निरंतर धडपड पाहा..!!

सात आठ सात आठ सात आठ
कासवदादाचा मंदिरात थाटमाट…!!

नऊ दहा नऊ दहा नऊ दहा
कासवगतीने ध्येय गाठत राहा…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️
*कासवगती*

आज गुरुजी म्हणाले
मित्रा! आमच्या वर्गात
जो करतो वेळेचा सन्मान
तोच यशस्वी होतो जीवनात

नको कुणाशी स्पर्धा
साधान्य आपली प्रगती
अभ्यासात असावे सातत्य
जरी असेल कासवगती

थांबला तो संपला
प्रयत्न असावा निरंतर
कासवगतीने संथ संथ
कापावे ध्येयाचे अंतर

जग ही चालते संथ गतीने
तो घेतं नाही झेप कधीच
प्रयत्न, मेहनत,सातत्याने
यशस्वी होतो नक्कीच.

*सौ, इंदू मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🐢🔸♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे