ई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला: वावडींग वड्या
0
4
8
2
9
3
माझी पाककला: वावडींग वड्या
साहित्य: १०ते१२ वावडींगाची पाने ,एक पाव चनाडाळीचे पीठ, लसण,हिरवी मिरची पेस्ट,कढीलिंब ,हळद फोडणीसाठी एक चिरलेला कांदा,धनेजि-याची पूड,मोहरी,चिरलेली कोथिंबीर एक वाटी,पाच ते सहा चिरलेली हिरवी मिरची,लसूण पेस्ट.
कृतीः वावडींगाची पाने स्वच्छ धुवून घ्या.चनाडाळीचे पीठ,मिरचीलसण पेस्ट, हळद, मीठ एकत्र करा.भज्याच्या पीठासारखे तयार करून पानावर बेसन लावून एकावर एक तीन चार पाने ठेवून घडी मारा.कुकरमध्ये लावा.एक शिट्टी घ्या.थंड झाल्यावर वड्या कापा.वरील साहित्य वापरून फोडणी घाला.
वाढप: वरील रेसीपी पाच ते सहा जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=========
0
4
8
2
9
3



