Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणसाहित्यगंध

झंझावात

मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड

0 4 8 2 9 0

झंझावात

चुकलेली ती पाऊले
बदललेल्या मार्गाने केला घात..
व्यसनाधीनता आली वाट्याला
आता देहात राहिला फक्त कंपवात…

किती लोकांनी समजावलं
मित्रांनी मायेचा दिला होता हात..
पण व्यसनाची मस्ती होती
आणि होता तारुण्याचा झंझावात..

बायको गेली सोडून माहेरी
तेंव्हा आईवडिलांनीच दिली साथ..
माझी मस्ती ऋणाईत होण्या ऐवजी
मी त्यांचा ही केला घोर विश्वासघात..

आईवडिल गेले कष्टी होऊन
कर्जबाजारीला कंटाळून..
तरीही माझे उघडले नाही डोळे
मी बसलो चुकीचे लोकांना कवटाळून…

तारूण्याचा हरवता झंझावात
आठवण झाली सगळ्या नात्यांची..
वृद्धाश्रमात पडलो जर्जर देह घेऊन
वेदनेत वाट बघत अंतिम क्षणांची..

मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे