Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रविदर्भ

आम्ही बालकवी स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 7

बे दुणे चार

बे एके बे
बे दुणे चार
पाढे करा पाठ
मिळेल मार

बे त्रिक सहा
बे चोक आठ
अ आ आई
झाले का पाठ

बे पंचे दहा
बे सखे बारा
मध्यंतर झाली
करा पोबारा

बे साते चौदा
बे आठे सोळा
खेळाचा तास
झाले सारे गोळा

बे नवे अठरा
बे दहा वीस
मोठे होऊ सारे
अभ्यास करा नीट

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

बे एके बे
बे दुणे चार
शाळेमध्ये शिकताना
मज्जा येते फार…

बे त्रिक सहा
बे चौक आठ
रिकाम्या तासाला आम्ही
करतो पाढे पाठ …

बे पंचे दहा
बे सके बारा
मिळून करतो काम
देतो एकतेचा नारा…

बे साते चौदा
बे आठे सोळा
मैदानात खेळासाठी
मुले लगेच होतात गोळा…

बे नवे अठरा
बे दाहे वीस
हसत खेळत शाळेमध्ये
सरुन जातो दिस…

बे एक बे
बे दुणे चार
दु:खी कष्टी लोकांना
देतो आम्ही आधार…

*सौ.आशा कोवे-गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

ऐका मुलानो ऐका
बे चा पाढा ऐका
एक तालात मिळून
चला देऊया ठेका

अंकगणिताचे चला
उघडूया दार
बे एक बे
बे दुणे चार

बे त्रिक सहा
नाचते मोर पहा
पोपट बनला भाट
बे चोक आठ

बे पंचे दहा
वाघाचे पंजे पहा
बे सखे बारा
सुसाट्याचा सुटला वारा

बे साती चौदा
रेंकू लागला ग गधा
बे आठी सोळा
सर्व प्राणी झाले गोळा

बे नऊ अठरा
वाघापासून आहे खतरा
बे दाहे वीस
पहा सुंदर मोरपिस

खेळीमेळीच्या वातावरणात
बे चा झाला पाढा पाठ
पेटली ज्योत ज्ञानाची
वाट गवसली यशाची

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*बे दुणे चार*

बे एक बे
बे दुणे चार
अभ्यास करा
नाहीतर मिळेल मार

बे त्रिक सहा
बे चौक आठ
कवितेचा अर्थ
करा सर्व पाठ

बे पंचे दहा
बे सक बारा
गरमी झाली कां ?
वाहत आहे वारा

बे साती चौदा
बे आठी सोळा
लागला मीना बाजार
मुले झाले गोळा

बे नवे अठरा
बे दाहे वीस
वाढ दिवस माझा
करू नका मीस

बे अकरा बावीस
बे बारा चोवीस
आता अभ्यास करायची
लागली मला हाऊस

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

बे एके बे
दोन गुणीले एक
आईने दिला
खायला केक

बे दुणे चार
दोन गुणीले दोन
बाबांनी आणला
आईस्क्रीमचा कोन

बे त्रिक सहा
आईने दिला चहा
बे चोक आठ
बाबांनी आणला माठ

बे पाचे दहा
माऊची पिल्ले पहा
बे साहे बारा
गाईला दिला चारा

बे साते चौदा
आई-बाबांना वंदा
बे आठे सोळा
खेळाया मित्र झाले गोळा

बे नवे अठरा
आता पाढे पाठ करा
बे दाहे वीस
पाढ्याची गंमत खास

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

आई म्हणे लेकरा
नको मारु चकरा
होतील रे टकरा
खाशील तू खेटरा

पुस्तके शिक चार
जग तुज समजणार
हाच आहे व्यवहार
नाही काही आडणार

वाचशील थोडेफार
नाही खाणार मार
नाही होणार हार
कौतुक होईल फार

जमला तुला जर
हा जगत व्यवहार
यश लाभेल अपार
होतील बे दुणे चार…….

*प्रा अर्चना कृष्णराव सुदामे*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

बे एक बे
बे दुणे चार
पाठ करू या
पाढे वारंवार

बे त्रिक सहा
बे चोक आठ
पाढ्यांची गणिताशी
मैत्री आहे दाट

बे पाचे दहा
बे साहे बारा
पाढ्याविना नाही
गणिताला थारा

बे साते चौदा
बे आठे सोळा
पाढेच ओढतात
गणिताचा गाडा

बे नऊ अठरा
बे दाहे विस
पाढे जणू काही
गणिताचा शीश..

बे एक बे चा
संपला पाढा
चला मुलांनो
तीनकडे वळा

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

बे एक बे
बे दुणे चार
ताईने केला
फुलांचा हार

बे त्रिक सहा
बे चोक आठ
बाहुलीचे माझ्या
लाल लाल ओठ

बे पंचे दहा
बे सक बारा
मिठीत घेऊन
आई घाली वारा

बे साते चौदा
बे आठे सोळा
फुगेवाला बघून
मुले झाली गोळा

बे नवे अठरा
बे दाहे वीस
गाण्यातून केला
पाढ्यांचा अभ्यास

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

बे एक बे अन बे दुणे चार…
पोरं आमची फारच हुशार

चिंगीला बाराखडी लिहिण्याचा भारीच कंटाळा
ट ला त आणि प ला फ म्हणत करते घोटाळा

शेवटच्या बाकावर रुबाबात बसतो सरपंच साहेबांचा राजा
पहिल्या बाकावरचा हुशार श्री वाजवतो त्याचा बाजा

मैदानावरच्या खेळात पक्या असतो साऱ्यांचा कॅप्टन
रोजच तोडतात सारे त्याच्या शर्टाचं बटण

दादागिरी करण्यात घेणार नाहीत कधी ही माघार
पण सुसंस्कारात मात्र माझी पोर नेहमीच बे दुणे चार

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️
*बे दुणे चार*

“चला मुलांनो आज
आपण पाढे म्हणूया”
“बे एके बे, बे दुणे चार
संगीत पाढे शिकूया “//1//

“आधी वाजेल संगीत
नंतर आपण म्हणूया”
“संगीत आमचे भारी
सारेजण नाचू गाऊया “//2//

“पाढे नाचत, नाचत
संगीता बरोबर म्हणूया”
“संगीताच्या तालावर
पाढे पाठ आपण करूया “//3//

“शाळेत आल्यावर, घरी
रोज रोज पाढे म्हणूया”
“पाढे म्हणता, म्हणता
गुणाकार आपण शिकूया “//4//

“गुरुजी, बाई सोबत
नाचत, गात पाढे म्हणूया”
“संगीत पाढे पाठ करत
गणितात हुशार होऊया “//5//

* श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️2️⃣❌2️⃣????4️⃣♾️♾️♾️

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे