Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 0 8 1 6

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा♥☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सोळा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : प्रेमा तुझा रंग असा📘*
*🔸सोमवार : २३ / जून /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*प्रेमा तुझा रंग असा*

वात्सल्य, करूणा, जिज्ञासा, मातृभू लालसा …
हिरकणी, अरण्य ऋषी, आमटे, तेरेसा …
सांग, नेमका प्रेमा तुझा रंग असा, कसा ?

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

आनंदही देतोस नि अश्नूही देतोस
प्रेमा तुझा रंग असा बदलवतोस
कधीच उमगले नाही रहस्य तुझे

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

प्रेमा तुझा रंग असा
जसा पाषाणाला फुटावा पाझर
अन् वाळवंटात वहावा निर्झर

*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*नेवासा अहिल्या नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

विकृत झाले प्रेमाचे स्वरूप
प्रेमा तुझा रंग असा
नाही कुणाचा कुणावर भरवसा

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

प्रेमा तुझा रंग असा
समईतला तेज प्रकाश जसा
तेल वातीच्या दृढ नात्याचा

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

प्रेमा तुझा रंग असा
ज्याला घ्यावा वाटला तसा
शीतल किंवा सुर्याहून प्रखर

*साजेश मगरे ताडकळसकर*
*ता. पूर्णा जि.परभणी*
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

कुणी कधी पाहता तुझ्याकडे
वाटेल टाकला फासा
प्रेमा तुझा रंग असा

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

अदृश्य प्रेमा तुझा रंग असा
आकाशी नवरंगांचा इंद्रधनू जसा
राधे सोबत कृष्ण तसा

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

*जाणून ह्रदयातील भावना*
*जागवलीस तुझ्या संवेदना*
*प्रेमा तुझा रंग असा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

प्रेमा तुझा रंग असा
प्राजक्ताचा सडा जसा
गंधाळलेल्या भावनाचा स्पर्श हवाहवासा

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

प्रेमा तुझा रंग असा
जागवल्या तू जुन्या आठवणीं
आले माझ्या डोळ्यात पाणी

*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

देशप्रेम जेंव्हा रंग लेऊन येते असा त्यागाचा
जवान मातृभूमीसाठी प्राण अर्पितो
तेंव्हा प्रेमा रंग तुझा असा केशरी असतो

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

राग द्वेष लोभा पलीकडे
प्रेमा तुझा रंग असा जरी
वाल्याचा ही वाल्मिकी करी

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

समजेना उमगेना तू असा कसा
सप्तरंगाच्या पलीकडे निराळा
रे प्रेमा तुझा रंग असा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

आकाशी इंद्रधनू जसा
प्रेमा तुझा रंग असा
मनाला भावणारा

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿
*प्रेमा तुझा रंग असा*

प्रेमा तुझा रंग असा
वेड लागते जिवाला
आस तुझ्या भेटीला

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🩷🔖➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 1 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
07:38