
0
6
0
4
9
7
महिलांचा एक दिवस
महिलांचा एक दिवस
म्हणून का रे हिनवता
एकाकी स्त्रीला पाहून
जागवू नका दानवता
विविध तिच्या रूपांची
दिखाऊ नसावी वाहवा
अपेक्षा सुखद क्षणाची
कशाला करतोस भावा?
तुडवू नकोस भावनांना
अबला तिला रे समजून
सहन करूनच वेदनांना
जन्म देते रे स्वतः झिजून
पावित्र्य तिच्या मातृत्वाचे
त्रिकाल अबाधित रे सत्य
पोवाडे गातोस दातृत्वाचे
का करतोस तू रे दुष्कृत्य?
समजू नकोस रे बाहुली
कर्तृत्व तिचे गल्ली ते दिल्ली
पेटव मनात तू रे प्रेमवात
निरुपयोगी फक्त फेरे सात
संग्राम कुमठेकर
जि लातूर
0
6
0
4
9
7



